आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकाही वाटणार घराेघरी ‘व्हाेटर स्लिप’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  राज्य निवडणूक अायाेगाने यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे महापालिकेला घातलेले बंधन अाणि टक्केवारी घसरल्यावर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेनेही उमेदवारांबराेबर व्हाेटर स्लिप अर्थातच मतदान पावती वाटण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे मतदानाअाधी महापालिका कर्मचारी प्रथमच धावपळ करून घराेघरी मतदान पावती वाटताना दिसणार अाहेत. 
 
मतदानाची घटती टक्केवारी राज्य निवडणूक अायाेगासाठी चिंतेचा विषय ठरली अाहे. टक्केवारी घसरल्यामुळे मतदारांचा स्पष्ट कल समजत नाही. मतदानाविषयी वा उमेदवाराविषयी काेणाची नाराजी असेल तर निगेटिव्ह वाेट अर्थातच ‘नाेटा’ वापरण्याची मुभा अाहे. काेणत्याही परिस्थितीत मतदार केंद्रापर्यंत पाेहाेचून त्यांनी अापले मत द्यावे, असा अायाेगाचा प्रयत्न अाहे. बऱ्याचवेळा मतदार यादीत नाव अाहे की नाही, नाव असेल तर मतदान केंद्र काेठे अाहे, असे प्रश्न पडून मतदार मतदानासाठी येत नाहीत. राजकीय पक्षांचे उमेदवार प्रत्येकापर्यंत पाेहचून मतदान पावतीद्वारे मतदारांना उद्युक्त करतात; मात्र हीकसरत खासगी किंवा वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे खराेखरच त्याची परिणामकारकता लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने कर्मचाऱ्यांमार्फत मतदान पावती घराेघरी जाऊन वाटपाचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेवक-मदतनीस असे जवळपास ९०० कर्मचारी नियुक्त केले अाहेत. मतदान पावतीवर प्रामुख्याने मतदाराचे नाव, यादीतील अनुक्रमांक तसेच मतदान केंद्रांचे नाव पत्ता असणार अाहे. 

...तर मदत केंद्रांवरही मिळणार पावती 
घरी पाेहाेचलेली मतदान पावती सापडल्यास मतदान केंद्रांजवळ महापालिकेचे मदत केंद्र असणार अाहे. मदत केंद्रांवर नाव पत्ता सांगितल्यास मतदार यादीतील नावाची खात्री करून नाव असेल तर मतदान पावती दिली जाणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...