आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विभाग पूर्ण ‘जलयुक्त’; उन्हाळ्यातही होणार टँकरमुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  पावसाचे वाहून जाणारे पाणी.. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जाणवणारी पाणीटंचाई.. शेती तर सोडाच, पण पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण.. ही वणवण थांबविण्यासाठी शासकीय आणि खासगी टँकरमार्फत होणारा पाणीपुरवठा.. त्यात कागदावर वेगळा आणि प्रत्यक्षात वेगळा.. त्यामुळे टंचाईमध्ये पाण्यासारखा पैसा ओतावा लागायचा.. परंतु यंदा जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याप्रमाणेच पैशांचीही बचत होताना दिसत आहे. ११ एप्रिल २०१६ ला नाशिक विभागात ७५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. ११ एप्रिल २०१७ ला केवळ २० टँकर सुरू अाहेत. 
 
नाशिक विभागात नगर, मालेगाव, जळगाव, धुळे, बागलाण, पाथर्डी, नेवासा, शिंदखेडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर, भडगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवते. गतवर्षी टंॅकरची ही संख्या ७५६ पर्यंत होती. शासकीय ७० तर ६८६ खासगी टँकर होते. परंतु दोन वर्षापासून जलयुक्तमुळे दुष्काळयुक्त परिसरात केवळ २० टँकर सुरू आहे. 
 
अशी आहे टँकरची संख्या 
वर्ष नाशिक नगर धुळे जळगाव 
११ एप्रिल २०१६ १२८ ५९० 0५ ३३ 
११ एप्रिल २०१७ ०८ ०१ 0६ 0५ 

टँकरला मागणी कमी 
^जलयुक्तच्याकामामुळेतसेच यंदा पाऊसही सरासरी इतका पडल्याने शहरासह ग्रामीण भागात मुबलक पाणी असल्याने टँकरद्वारे पाण्याची मागणी खूपच कमी आहे. -अतुल धोंगडे, टँकरमालक 

चार कोटी रुपये वाचणार 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचे अभियान सुरू केले. त्यामुळे नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात जलयुक्तचे उत्कृष्ट कामे झाल्याने वाढत्या तपमानातही मुबलक पाणी उपलब्ध आहे. यापूर्वी नाशिक विभागात ६८६ खासगी टँकरने प्रतिदिन ५४० गावे आणि हजार १६८ गावांना पाणीपुरवठा केला जायचा. यासाठी प्रति टँकर ९०० रुपयाप्रमाणे शासनाचे प्रतिदिन लाख १७ हजार ४०० रुपयांचा खर्च हाेत हाेता. एप्रिल, मे महिन्यात टँकरची संख्या वाढत असली तरी याच सरासरीने हिशेब केला तर कोटी ७० लाख ४४ हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा जलयुक्त अभियानामुळे केवळ २० शासकीय टँकर सुरू असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...