आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प अहवालच नाही; दमणगंगाचे पाणी मिळणार कधी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्याचे अाश्वासन दिले असले तरी दमणगंगा खाेऱ्यात चितळे समितीने ८३ टीएमसी पाणी निश्चित केले हाेते. मात्र, राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने ती उपलब्धता ५५ टीएमसी दाखवली अाहे. दमणगंगा-पिंजाळ लिंकमार्फत २० टीएमसी पाणी मुंबईला वळवण्यात येणार अाहे. उर्वरित गुजरातला वाहून जाणार अाहे. कारण, मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी दमणगंगा-गाेदावरी लिंकचा प्रकल्प अहवालच केंद्र शासनाने ( राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने) अद्याप तयार केलेला नाही. 

सन २०१०च्या गुजरात अाणि महाराष्ट्र सामंजस्य करारातील अट क्रमांक नुसार महाराष्ट्रात गाेदावरी गिरणा खाेऱ्यात पाणी वळवण्याचे प्रकल्प तयार करणे अपेक्षित हाेते. मात्र, केंद्राने गुजरातला झुकते माप देत महाराष्ट्राचे प्रकल्प अहवालच तयार केले नाहीत. तसेच महाराष्ट्र गुजरातचा पाण्याचा वाटा अद्याप निश्चित झालेला नाही. अगाेदर त्यांनी गुजरात महाराष्ट्राला किती पाणी मिळणार याची निश्चिती करणे अाणि महाराष्ट्रातील प्रकल्पांचे अहवाल तयार करून घेणे महत्वाचे अाहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ तर पालघर जिल्ह्यातील जव्हार अाणि माेखाडा या तालुक्यांतील पाणी अडविण्याचा हा प्रकल्प असून यात पेठ तालूक्यात भुगड अाणि जव्हार तालुक्यात खारगिल येथे धरणांची उभारणी हाेईल यातील २० टीएमसी पाणी मुंबईला दिले जाईल. उर्वरीत पाणी गुजरातच्या मधुबन धरणात वाहून जाईल. 

दहा पत्र लिहिली, अहवाल नाही 
सातवर्षातकिमानदहा वेळा राष्ट्रीय जलविकास अभिरणास पत्र लिहुन प्रकल्प अहवाल तयार करण्याची विनंती केली अाहे मात्र अाजपर्यंत अहवालच तयार झालेला नाही. नव्याने जलनिश्चिती अहवाल तयार करण्यासह गुजरात महाराष्ट्राचा पाण्याचा वाटा किती हे शासनाने अगाेदर निश्चित करणे गरजेचे अाहे. 
- राजेंद्र जाधव, अध्यक्ष, जलचिंतन संस्था 
बातम्या आणखी आहेत...