आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपी बेशिस्त ; बिघडले शहराचे ‘स्वास्थ्य’, महिला, बालकांसह सर्वांचे वावरणे झाले कठीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेलराेड येथक दुकानात मद्य खरेदीसाठी अशी गर्दी हाेती. ग्राहकांनी अापली वाहने रस्त्यावर पार्क केली. - Divya Marathi
जेलराेड येथक दुकानात मद्य खरेदीसाठी अशी गर्दी हाेती. ग्राहकांनी अापली वाहने रस्त्यावर पार्क केली.
नाशिक- राष्ट्रीय राज्य महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अाता रहिवासी वस्तीतील मद्य दुकानांना लागलेल्या रांगा, मद्यासाठी हाेणारा संघर्ष, या ठिकाणावरून महिला, युवतीसह वृद्धांना काेंडमारा सहन करीत करावा लागणार वावर त्यातून संयम सुटून थेट महिला रणरागिनींकडून दारू दुकानांना लक्ष्य करण्याची गंभीर वळण घेतल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’ने सायंकाळी केलेल्या पाहणीत उघड झाले. 
 
ठरावीक ठिकाणी दारू मिळत असल्यामुळे येथे अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रस्त्यात ठाण मांडून व्यवसाय थाटला अाहे. मद्यपी बेशिस्तपणे रस्त्यात वाहने लावून खरेदीसाठी जात असल्यामुळे वाहतूक काेंडी हाेत अाहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, मद्यपींकडून अापसी भांडणात रस्त्यावरून येणाऱ्या महिलांमध्ये दहशत असल्यामुळे अाता ही सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी पाेलिसांची कसाेटी लागत अाहे. महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने, बिअर बार, वाईन शॉप, अनुज्ञाप्तीचे नूतनीकरण करण्याचे आदेश शासनाना दिले आहेत.
 
या आदेशाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११०० पैकी जिल्ह्यातील ७५० अाणि शहरातील ३१ दुकानांचे नूतनीकरण केल्याने हे दुकाने बंद केले आले. शहरातील पंचवटी, जेलरोड, अंबड, सातपूर आणि सिडको परिसरातील एक-दोन दुकाने सुरु असल्याने या दुकानांवर मद्यपींच्या रांगा आहेत. आठ दिवसांपासून या दुकानांवर होणारी गर्दी नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत शहरातील मद्य विक्री सुरु असलेल्या रहिवाशी परिसरातील नागरीकांशी विशेषत: महिलांशी संवाद साधत त्यांना यामुळे हाेणाऱ्या त्रासाची माहिती घेतली. 
 
-अंबड, दातीरनगर येथे नागरी वस्तीत बिअर शॉप ला परवानगी दिलीच कशी? आम्ही याबाबत तक्रारी केल्या, निवदेन दिले. मात्र कारवाई झालीच नाही. यानंतर दखल घेतल्यास आंदोलन छेडू. -अरुण दातीर, सामाजिक कार्यकर्ते. 
 
-वाईन शॉपआणि बिअर शॉप हे मद्यपींचे अड्डे बनले आहेत. त्यांना वाटते की आम्हा गुंडांना नागरिक खूप घाबरतात. पण आता या रणरागिणी रस्त्यावर उतरतील आणि आपला रौद्र अवतार दाखवून देतील. -संगीता दातीर, नागरिक 
 
-एकीकडे सामाजिक शांततेसाठी नियम तर दुसरीकडे तेच वातावरण बिघडण्यासाठी डोळेझाक. असे कसे प्रशासन? दररोज वाईन, बिअर शॉप, बार यांच्यासमोर गोंधळ चालतो यावर कारवाई का केली जात नाही. -मुक्ताबाई तिडके, नागरिक 
 
-अनेक वाईनशॉप, बिअर बार यात जास्त युवकच दिसत आहेत. त्यामुळे युवा पिढी बरबाद होते आहे. दुचाकीचे कागदपत्रे नसल्यास दंड फाडतात. मग वाईन शॉप समोर बेशिस्त वाहनांवर कारवाई का नाही? -सचिन महाजन, नागरिक
 
या वाइन शॉप्सवर बेशिस्तपणा : शुभम पार्क, दत्त मंदिर बस स्टॉप, त्रिमूर्ती चौक, महाकाली चौक, दत्त चौक, अंबड, इंदिरानगर, पाथर्डी रोड यासह अनेक ठिकाणी असलेल्या वाईन शॉप वर मद्यपींची गर्दी दिसून येते आहे. या सर्वच ठिकाणी मद्यपी थेट रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहन लावीत असल्याने वाहतूकीचाही खोळंबा होत आहे.
 
वाइन शॉपला राजकीय अभय : सिडकोतील अनेक वाईन शॉपच्या बाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर माहिती घेतली असता, अनेक गंभीर बाबी समोर आल्या. यात नागरिकांचे लोकप्रतिनिधी म्हणविणारे अनेक राजकीय नेतेचे या वाईन शॉप चे मालक आहेत. त्यांच्या राजकीय वरदह्स्ताने कायदा पायदळी तुडवीत सर्व बाबी खुलेआम सुरू आहे. 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी आणि फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...