आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तन कर्करोग पूर्वतपासणी शिबिर 17मार्चपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी माेफत स्तन कर्करोग पूर्वतपासणी सप्ताहास जिल्हा रुग्णालयात मार्च राेजी प्रारंभ झाला. हे शिबिर १७ मार्चपर्यंत सुरू राहाणार अाहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचा भाग म्हणून विनामूल्य स्तनाच्या कर्करोगाची पूर्वतपासणी शिबिर जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आले अाहे.
 
या सप्ताहाचा शुभारंभ जागतिक महिलादिनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, उपजिल्हाधिकारी सरीता नरके, वंदना पाटील, आरोग्य उपसंचालिका सौ. घोडके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. वाकचौरे, मनपा नाशिक आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे, डॉ. होले, डॉ. अनंत पवार, स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ.वर्षा लहाडे, तसेच ब्रेस्ट इक्झाम युनिटच्या संचालिका गौरी नवलकर यांच्या उपस्थितीत झाला. यासाठी अमेरीकन तंत्रज्ञानाच्या रेडियेशन फ्री अत्याधुनिक उपकरणाद्वारे स्तन कर्करोगाबाबत मोफत तपासणी केली जाणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ङिपीडीसी निधी अंतर्गत अमेरिकन अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणीची चार यंत्रे उपलब्ध करुन दिली अाहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार कर्करोगाच्या जनजागृतीवर कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये निदान करण्यावर भर दिला आहे. भारतामध्ये स्त्रियांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण २५ टक्क्याहून अधिक अाहे. तर स्तन कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेतील निदानाचे प्रमाण अगदी अल्प म्हणजे टक्के आहे. स्तन कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेचे निदान होणे हे स्तन कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यास उपाय म्हणून अनेक संशोधनातून सिध्द झाले असल्याचे ब्रेस्ट इक्झाम युनिटच्या संचालिका गौरी नवलकर यांनी नमूद केले.
 
सप्ताहाचा शुभारंभ प्रसंगी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका ,परिचारिका भगीनी तसेच महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अमेरीकन तंत्रज्ञानाच्या रेडियेशन फ्री अत्याधुनिक उपकरणाचे औपचारीक उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. महिलांना स्तनाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन समुपदेशन करण्यात येणार असून याचा भगिनीनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जगदाळे यांनी केले. 
 
बातम्या आणखी आहेत...