आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण अन् छेडछाड; बहाद्दर तरुणीचा दोन रोडरोमिओंना धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काॅलेजराेडवर भरदुपारी तरुणीची छेडछाड करण्याचे कृत्य दाेन तरुणांना चांगलेच महागात पडले. दुचाकीचा कट मारत या दाेन सडकसख्याहरींनी या तरुणीशी हुज्जत घालत तिला मारहाण केली. या तरुणीने कडवा प्रतिकार करत दाेघांची तक्रार पाेलिसांकडे केली, तसेच या टवाळखाेरांच्या दुचाकीचा क्रमांकही दिला. यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच तासांत दाेघांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अाहे. या दाेन संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात अाली अाहे.
गुरुवारी (दि. ८) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कृषीनगर येथे भररस्त्यात हा प्रकार घडला होता. तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांना अटक केली. पीडितेच्या तक्रारीनुसार संशयितांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याबाबत पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कृषीनगर परिसरातील आपल्या होस्टेलकडे पायी जात असताना अॅक्टिव्हावर (एमएच १५ इवाय ०५५९) अालेले दोन संशयित पाठलाग करून छेडछाड करत होते. त्यांना हटकले असता संशयित दोघांनी तरुणीला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने दोघांना कडवा प्रतिकार केला. मात्र, दोघांच्या पुढे तिचा प्रतिकार कमी पडला. अखेर पीडितेने जाब विचारत त्यांना ‘सॉरी’ म्हणण्यास सांगितले असता दोघांनी तिचे केस पकडून तिला भररस्त्यात मारहाण केली. काही नागरिकांनी तरुणीला सोडवले, मात्र काेणीही या दाेघांना पकडण्याचे धैर्य दाखवले नाही. अखेर तरुणीनेच दुचाकीचा नंबर घेत गंगापूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांनी या तरुणीची चौकशी करत घडलेला प्रकार समजून घेत तत्काळ दुचाकीचा शोध सुरू केला. आरटीओतून ही दुचाकी सातपूर येथील असल्याची माहिती मिळाली. पथकाने सातपूर येथून दुचाकी मालकास ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने दुचाकी सकाळी संशयित धनंजय कुंभकर्ण घेऊन गेल्याची माहिती दिली. या माहितीच्या अाधारे पथकाने कुंभकर्ण यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने दिलीप विष्णू गायकवाड (रा. सिद्धार्थनगर) याच्यासोबत छेडछाड केल्याची आणि मारहाण केल्याची कबुली दिली. पथकाने सिद्धार्थनगर येथून संशयिताच्या मुसक्या अावळल्या. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत या सडकसख्याहारींच्या मुसक्या आवळण्यास गंगापूर पोलिस यशस्वी ठरले. वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर, सहायक निरीक्षक राजेश गवळी, राजन बेंडाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल पथकाचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी अभिनंदन केले. तरुणीच्या धैर्याचे त्यांनी कौतुक केले. छेडछाडीला घाबरता पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन आयुक्तांनी तरुणींना केले अाहे.

पोलिस मदतीला अाले धावून
^सुरुवातीला तक्रार देण्यास भीती वाटत होती. पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वास दिल्याने तक्रार देण्याचे धाडस केले. पोलिसांनी तत्काळ तपास करत दोघांवर कारवाई केली. पोलिसांमुळेच रस्त्यावर मुली सुरक्षित फिरत आहेत. -पीडित तरुणी

तक्रारीची वाट पाहता तपास
^पीडितेने भेदरलेल्या अवस्थेत पाेलिस ठाण्यात प्रवेश केला. सुरुवातीला तक्रार देण्यास तिने नकार दिला. मात्र, सुरक्षेची हमी दिल्यानंतर तिने घटनेची माहिती दिली तसेच संशयितांच्या दुचाकीचा क्रमांक दिल्याने त्यानुसार तपास सुरू केला. पाेलिस पथकाने दुचाकी मालकाला शोधून या दोन संशयितांना त्यांच्या राहत्या घरी अटक केली. संशयित दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. -महेश देवीकर, वरिष्ठ निरीक्षक, गंगापूर पाेलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...