आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादातून विवाहितांच्या छळवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कौटुंबिक विविध वादांतून विवाहितांचा छळ होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारी २०१६ मध्ये २४१ गुन्ह्यांची पोलिसांत नोंद झाली, तर २०१७ मध्ये १७ गुन्हे दाखल झाले. यामध्ये विवाहितेचा खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे या गुन्ह्यांतही वाढ झाल्याचे दाखल गुन्ह्यांतून निदर्शनास येत आहे. घरगुती वाद मिटवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ‘चला नाते जपू या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
शहरात गंभीर गुन्ह्यांसह घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. कौटुंबिक वादात विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे आदी गंभीर गुन्ह्यांची रोज एक तरी नोंद पोलिस ठाण्यात होत आहे. विवाहितेच्या खुनाच्या तीन गंभीर घटनांची नोंद पोलिसांत असल्याने पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जोडप्यांसाठी ‘चला नाते जपू या’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. वाद चार भिंतीच्या आत मिटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असले तरी दोन्ही कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी वाद न्यायालयात जातो. पोलिस ठाण्यात समुपदेशन कक्ष नसल्याने शेवटी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास प्राधान्य दिले जाते. शासनाच्या उदासीनतेमुळे काही पोलिस ठाण्यातच हे केंद्र सुरू आहेत. जानेवारी २०१६ मध्ये ४९८ च्या गुन्ह्यांत विवाहितांचा खून झाला आहे. जिवे मारण्याचा प्रयत्नाचे गुन्हे, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूस कारणीभूत २६ गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक ४९८ च्या गुन्ह्यांमध्ये पैशांची मागणी, चारित्र्यावर संशय आणि स्रीधन काढून घेत घरबाहेर काढण्याच्या प्रकाराचे २४१ गुन्हे दाखल आहेत. २०१७ या वर्षात १७ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांकडून विशेष कक्ष स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

^घरगुती वादातूनगंभीर गुन्हे घडण्याची शक्यता अधिक असते. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी या जोडप्यांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कक्ष पोलिस ठाण्यात स्थापन करण्यात येणार आहे. -डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
 
बातम्या आणखी आहेत...