आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सबलीकरणाचा सायकल रॅलीतून संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  नॅशनल पंजाबी वेल्फेअर असोसिएशन, सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने आणि नाशिक पोलिसांच्या सहयोगाने जागतिक महिला दिनानिमित्त शहरात महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बी बोल्ड फॉर चेंज म्हणजेच ‘बदल घडवण्यासाठी धाडसी व्हा’ असा संदेश देत शनिवारी (दि. ४) महिला मोठ्या संख्येने सायकल रॅलीत उत्साहात सहभागी झाल्या होत्या. महिला सबलीकरणाचा उद्देश ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
यंदा या रॅलीमध्ये २०० पेक्षा जास्त महिलांनी यात सहभाग घेतला होता. 
 
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन मृणाल पाटील, भारतीय नेमबाजांना प्रशिक्षण देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे, जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांचा या रॅलीत प्रमुख सहभाग होता. या अनोख्या सायकल रॅलीचे अाकर्षण ठरल्या रॅलीत सहभागी झालेल्या ७२ वर्षीय रेखा तिवारी. याबरोबरच शहरात पर्यटनासाठी आलेल्या लिजा (अर्जेंटिना), लुथा ( जर्मनी) यांनी फेसबुकवरून नोंदणी करत त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रत्येक महिलेला सायकलिस्ट फाउंडेशनच्या पंढरपूर सायकलवारीत तसेच नाशिक पेलेटॉनमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. 
 
विशेष वेशभूषा, उत्कृष्ट सायकल सजावट आणि महिला सबलीकरणासाठी विशेष संदेश लिहिणाऱ्या महिलांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात विशेष वेशभूषेचे पहिले पारितोषिक संवेदना मंचाच्या वृषाली बिरारी, दुसरे पारितोषिक डॉ. मनीषा रौंदळ तर स्वाती करकरे यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले.
 
उत्कृष्ट सजावट करण्यात आलेल्या सायकलींमधून पहिला क्रमांक सोनाली सुर्वे, दुसरा क्रमांक पल्लवी पवार तर डॉ. संगीता लोढा यांना तिसरे बक्षीस देण्यात आले. महिला सबलीकरण संदेशाबद्दल नीता नारंग, सोफिया कपाडिया, स्नेहल देव यांना बक्षीस देण्यात आले. 
 
यावेळी नॅशनल पंजाबी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंग आनंद, उपाध्यक्ष अजय थापर, सेक्रेटरी बलजितसिंग सिबल, संदीप गुलाटी, अनिल गुप्ता, मुनीश नारंग, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी, उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, वैभव शेटे आदी सदस्य उपस्थित होते. 
 
 
यांचा झाला गौरव
कविता राऊत : ऑलिम्पिक पटू
संजीवनी जाधव : मॅरेथॉनविनर 
मोनिका आथरे : मुंबई मॅरेथॉन, दिल्ली मॅरेथॉन 
नंदा गायकवाड : नाशिक पेलेटॉन ५० किमी 
हर्षदा आवळे : नाशिक पेलेटॉन ५० किमी 
जसविंदर संधू : नाशिक पेलेटॉन ५० किमी 
अर्चना घुमरे : नाशिक पेलेटॉन १५० किमी 
योगिता घुमरे : नाशिक पेलेटॉन १५० किमी 
अनुजा उगले : वसई-विरार ट्रायथलॉन प्रथम क्रमांक 
देविका पाटील : सप्तशृंगी  हिल मॅरेथॉन, पुणे ट्रायथलॉन 
प्रांजळ पाटोळे : परळी बालाघाट रेस विनर 
शिवानी वाळके : विभागीय सायकलिंग सातवा क्रमांक 
डॉ.रत्ना अष्टेकर : एनआरएम ८० किमी 
मनीषा भामरे: एनआरएम ८० किमी 
प्रतिभा आहेर : अष्टविनायक सायकल यात्रा 
डॉ.श्वेता भिडे : नाशिक पोलिस मॅरेथॉन 
बातम्या आणखी आहेत...