आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: गतिराेधकावर अादळली दुचाकी, महिला ट्रकखाली चिरडून ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखानगर येथे दुचाकी अपघातात हाच ट्रक अंगावरून गेल्याने महिला जागीच ठार झाली. या अपघाताने संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले. - Divya Marathi
लेखानगर येथे दुचाकी अपघातात हाच ट्रक अंगावरून गेल्याने महिला जागीच ठार झाली. या अपघाताने संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले.
सिडको - लेखानगर येथे सर्व्हिसरोडने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा गतिरोधकावर आदळून तोल गेल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली. मागून येणारा ट्रक अंगावरून गेल्याने महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. या घटनेसंदर्भात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
गुरुवारी (दि. २) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अण्णासाहेब कटारे त्यांच्या पत्नी छाया कटारे दुचाकीवरून (एम. एच. १५ डीएन ८६२१) सीबीएसकडे निघाले होते. लेखानगर परिसरात बालभारती कार्यालयाजवळून जात असताना रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी उधळली. यात तोल गेल्याने छाया कटारे या रस्त्यावर पडल्या. याचवेळी मागून भरधाव आलेल्या ट्रक (आर. जे. १५ जीए ४०८५) त्यांच्या अंगावरून गेला. थेट चाकाच्याच खाली आल्याने कटारे (वय ५५, रा. चेतनानगर) या जागीच गतप्राण झाल्या. काही कळायच्या आतच संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला. 

या घटनेनंतर जमलेल्या नागरिकांनी ट्रकचालक नथ्थाराम उपमाराम माळी (रा. जैसलमेर, राजस्थान) याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. दुचाकीचालकाची चूक नसताना नाहक एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

यापूर्वीही अनेक अपघात 
शहरात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बनविण्यात आलेले आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने बनविले गेलेले गतिरोधकच अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. लेखानगर येथील अशाच पद्धतीने बनविलेला गतिरोधक अपघात टाळण्यापेक्षा अपघाताला आमंत्रण देत आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले. मात्र, गुरुवारच्या अपघाताने महिलेचा बळीच घेतला. या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...