आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारी प्रतिबिंब स्पर्धेच्या विजेत्यांची पेंटिंग्ज सात शहरांत प्रदर्शित होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महिला आपल्या आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचाराने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. त्यांच्या  या यशस्वितेचे कौतुक करण्यासाठी दैनिक भास्कर आणि केंट मिनरल आरओ यांच्या सहकार्याने महिलांसाठी ‘नारी प्रतिबिंब’ ही पेंटिंगची स्पर्धा संपूर्ण भारतात आयोजित करण्यात आली होती. त्यांत संपूर्ण भारतातून १२ हजारांहून अधिक पेंटिंग्ज प्राप्त झाल्या. अभिनेत्री दीप्ती नवलच्या अध्यक्षते खाली असलेल्या परीक्षकांनी या पेंटिंग्जचे परीक्षण केले आहे.
 
देशातील सात शहरांमध्ये विजेत्यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. जयपूर, भोपाळ, अहमदाबाद, रांची, नाशिक व पटनामध्ये १४ ते १६ एप्रिलपर्यंत आणि चंदिगडमध्ये २१ ते २३ एप्रिलपर्यंत प्रदर्शन भरविले जाईल. 

या स्पर्धेचा विषय ‘नारीच्या नजरेतून नारी’ होता. स्पर्धेत पाठविल्या जाणाऱ्या पेंटिंग या ‘नारीच्या नजरेतून नारी’ या विषयाला अनुसरून आजची स्वतंत्र, आक्रमक व आत्मविश्वास असलेल्या नारीच्या प्रतिमेची वर्णन करणारी असावी. महिलांनी या स्पर्धेत उत्सफूर्त प्रतिसाद नोंदवत सहभागी झाल्या आणि थोड्याच दिवसांत १२ हजारांहून अधिक पेंटिंग प्राप्त झाल्या. ४ एप्रिल रोजी दिल्लीत झालेल्या परीक्षकांच्या बैठकीत वेगवेगळ्या राज्यातून प्रत्येकी २५-२५ विजेत्यांची निवड करण्यात आली. या राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबबरोबरच चंदिगडसुद्धा 
समाविष्ट आहे. 

सात शहरांमध्ये होणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून, प्रवेश मोफत असेल. प्रदर्शनात असलेल्या पेंटिंग्ज विक्रीसाठीसुद्धा उपलब्ध असणार आहेत. यातून प्राप्त होणाऱ्या निधीतून एक हिस्सा स्वयंसेवी संस्थांना दिला जाणार आहे.

नाशिकमध्ये प्रदर्शन
प्रदर्शनाचा कालावधी : १४ ते १६ एप्रिल २०१७
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी 
७ वाजेपर्यंत
ठिकाण : महात्मा फुले कलादालन, कालिदास कला मंदिराशेजारी, शालिमार.
बातम्या आणखी आहेत...