आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बचत गटांनी वेळोवेळी नोंदी अपडेट करणे गरजेचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रत्येक बचत गटाने बचत गटासाठी मिनी ट्रॅक्टर वापरातून मिळणारी रोख रक्कम जमा करून ती रोख स्वरूपात सभासदांना वाटप करता प्रत्येक सदस्याच्या बँक अकाउंटवर जमा करावी. तसेच, ट्रॅक्टरचालकाचे वेतनदेखील बँक अकाउंटवर जमा करावे. बचतगट नोंदणी प्रमाणपत्र, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्रे, बँकेची कागदपत्रे इत्यादींसह नियमित बैठकांचे इतिवृत्त इतर सर्व रेकॉर्ड दप्तरी अद्ययावत ठेवण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक संचालक हेमंत जाधवर यांनी विभागातील लाभार्थी बचत गटांच्या अध्यक्षांच्या बैठकीत केले. 
 
जाधवर म्हणाले की, शासन निर्णयानुसार बचत गटांनी दरवर्षी १० मेपूर्वी ट्रॅक्टर विकला नसल्याचे गहाण ठेवला नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तांना सादर करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेतील नाशिक विभागातील लाभार्थी बचत गटांच्या अध्यक्षांची समाजकल्याण विभागातील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात बैठक सहायक संचालक हेमंत जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जाधवर बोलत होते. यावेळी समाजकल्याण अधिकारी के. जी. बागुल, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक धनाजीराव शिंदे आदींसह अधिकारी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील सुमारे १०० स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिला पुरुष अध्यक्ष उपस्थित होते. 

नाशिक विभागातील सामाजिक न्याय विभागांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये सन २०१२-१३ पासून स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर उपसाधने वाटप ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत नाशिक विभागात सन २०१२-१३ पासून २०१५-१६ अखेरपर्यंत ६४६ स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले आहेत. या लाभार्थी बचत गटांच्या अध्यक्षांची बैठक मंगळवारी बोलविण्यात आली होती. यावेळी नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील काही यशस्वी बचत गटांच्या अध्यक्षांनी बचत गटांच्या यशोगाथेविषयी मनोगत व्यक्त केले. 

या बैठकीस अहमदनगर येथील बी. व्ही. देव्हारे, जळगाव येथील शोभा चौधरी, नंदुरबार येथील एस. एल. वसावे, नाशिक येथील एस. बी. त्रिभुवन आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार धनाजीराव शिंदे यांनी मानले. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...