आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्फिंगव्दारे फाेटाेंना अश्लिल रूप; पाॅर्न साइटवर केली जाते बदनामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अापल्या विविध अदांचे फाेटाे, सेल्फी अाणि व्हिडीअाे फेसबुक वा इन्स्टाग्रामवर अपलाेड करण्याची ‘फॅशन’ तरुणींना अाता महागात पडत अाहे. साेशल मीडियावर अपलाेड केलेल्या फाेटाेंमधील चेहरे चाेरुन ते अश्लिल फाेटाेंना लावण्याचे प्रकार सर्रास सुरू अाहेत. गंभीर बाब म्हणजे हे फाेटाे पाॅर्न साइटवर संबंधित मुलींच्या नावासह ते टाकले जाताहेत. इतकेच नाही तर नाशिक सारख्या शहरातही अाता चक्क माॅर्फिंग करुन व्हिडाेअाे क्लिपही तयार केल्या जात अाहेत. 
 
सोशल मीडियावर नियमीतपणे 
सक्रिय असणाऱ्या महिलांनी सावध होण्याची गरज आहे. कारण फेसबुकवरील महिलांचे फोटो चोरून ते माॅर्फिंग करुन पाॅर्न साइटवर अपलोड करणारी टोळी कार्यरत असल्याची बाब काही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट हाेते. छायाचित्रांमध्ये बदल करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे मॉर्फिंग. मूळ छायाचित्रात सॉफ्टवेअरव्दारे हवे ते बदल करीत मूळ छायाचित्राला दोन किंवा अधिक छायाचित्रांसोबत एकत्र करून वेगळ्या स्वरुपात सादर केले जाते. हे काम एवढ्या सुक्ष्मपणे केले जाते की, मॉर्फिंग केलेले छायाचित्र पाहताना त्यातील बदल जाणवत नाही. मुळात फोटोंचं मॉर्फिंग करणे किंवा अशा प्रकारे मॉर्फिंग करून व्हिडिओ तयार करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. सध्या उपलब्ध असलेली विविध सॉफ्टवेअर्स आणि मोबाइल अॅपच्या सहाय्याने असे मॉर्फिंग करणे सहज शक्य झाले आहे. काही वर्षापुर्वी प्रसिध्द व्यक्तींचे फाेटाे वा व्हिडीअाे माॅर्फिंग करुन ते व्हायरल केले जात. अाता मात्र सर्वसामान्यांचेही फाेटाे अाणि व्हिडीअाे मार्फिंगचे प्रकार वाढले अाहे. नाशिकसारख्या शहरात अाजवर केवळ फाेटाे मार्फिंगच्या तक्रारी येत हाेत्या. काही महिन्यांपुर्वी उपनगर पाेलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार नाशिकमधूनच व्हिडीअाे मार्फिंग करण्यात अाल्याचे पुढे अाले अाहे. 

नाशिक येथे राहणाऱ्या युवतीच्या छायाचित्रावरून बनावट अश्लील छायाचित्र व्हिडीअाे क्लिप तयार करून ते तिला पाठविले. तसेच, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांना तीन महिन्यांपुर्वी उपनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. यात एक नाशिकचा, तर दुसरा संशयित नवी मुंबईतील आहे. या दोघा संशयितांनी पीडित युवतीचा छायाचित्रावरील चेहरा कट करून त्यावरून अश्‍लील छायाचित्र व्हिडिओ तयार करून ते तिच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले हाेते. 

मुळच्या लातूरमधील परंतु नाशिकमध्ये रहिवास असलेल्या एका मुलीशी मुत्सदिक नावाच्या मुलाशी फेसबुकवर ओळख झाली. त्यातून मुत्सदिकने या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. मुत्सदिकचे लग्न झाल्यानंतरही त्याने त्या मुलीचा पिच्छा सोडला नाही. या मुलीला धडा शिकवण्यासाठी तिच्या चेहऱ्याचं मॉर्फिंग करून तिचे अश्लील फोटो फेसबुकवर टाकायला सुरूवात केली. तिने तातडीनं नाशिक पोलिसांत तक्रार दाखल केली. नाशिक पोलिसांनी गुन्हा लातूरमध्ये वर्ग केल्यावर मुत्सदिकला अटक करण्यात आली. 

मुलीची अाेळखही ठेवली जाते गुप्त 
अशा प्रकरणात घाबरून जाता जवळच्या कुठल्याही पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. कुणालाच या प्रकरणाबाबत कळू नये म्हणून तसे पत्रही न्यायमूर्तींना देता येऊ शकते. म्हणजे ती माहिती कुणाला कळत नाही. पुढे न्यायालयात खटला उभा राहिला तरीही आपला जबाब सर्वांसमोर घेता इन कॅमेरा देता येऊ शकतो. तशी व्यवस्था कायद्यानं करण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रार केल्यास प्रसारमाध्यमांमध्ये माहिती जाईल, आपले नाव समोर येऊन आपली बदनामी होईल ही भीती मुलींनी मनातून काढून टाकावी. कारण याच भीतीमुळे मुली तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. 

फेसबुकवर झालेली अाेळख पडली महागात 
नाशिकमध्ये तयार झाली व्हिडीअाे क्लिप 
 
तीन वर्षाची शिक्षा अाणि पाच लाखांचा दंड 
एखाद्या व्यक्तीचा चेहऱ्याचा भाग किंवा शरीराचा कोणताही भाग मॉर्फ अथवा एडीट करुन विविध माध्यमांद्वारे तो इंटरनेटवर अपलोड करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा व्यक्तींवर माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा या प्रकरणात आयटी अॅक्टबरोबरच विनयभंगाचाही गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आयटी अॅक्टमध्ये तरुणींसंबंधात पुढील कलमांनुसार ६६ (अ), ६६ (ब), ६६ (सी), ६६ (डी) आणि ६६ (ई) कारवाई केली जाते. सायबर कायद्यानुसार अशा व्यक्तीस तीन वर्षाची शिक्षा अाणि लाखांपर्यंत दंड हाेऊ शकताे. 

तक्रारींसाठी करा संपर्क 
सायबरक्राइमशी संबंधित काेणाच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी ९७६२१००१०० या व्हॉट‌्सअॅप क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गाेपनीय ठेवले जाते. 
 
माॅर्फिंग टाळण्यासाठी ही घ्यावी काळजी... पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा...
बातम्या आणखी आहेत...