आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेना-भाजपत टस्सर, अन्य पक्षांचे नाराजांकडे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन सदस्यीय प्रभाग अाणि त्यातच दाेन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने प्रभाग क्रमांक १५ ची लढत अटीतटीची हाेणार अाहे. या प्रभागात एकमेव खुल्या गटात लढण्याची पुरुष उमेदवारांना संधी असल्याने या जागेसाठी माेठी माेर्चेबांधणी हाेणार अाहे. तर अनेकांना स्वत:च्या उमेदवारीवर पाणी फिरवत घरातील महिलेला निवडणुकीच्या मैदानात अाणावे लागणार अाहे. माजी अामदार वसंत गिते यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या या प्रभागात त्यांच्याशी चार हात करण्यास अनेकांनी कंबर कसली अाहे.
चार सदस्यीय निवडणुकीची पद्धत नाशिकमध्ये राबविण्यात येणार असली तरीही प्रभाग क्रमांक १५ अाणि १९ मध्ये तीनच सदस्यांची निवड हाेणार अाहे. या प्रभागात अनुसयानगर, गीताईनगर, बनकर चाैक, रवींद्र विद्यालय, काठे गल्ली, भाभानगर, जनरल वैद्यनगर, किनारा हाॅटेल परिसर, शंकरनगर, मिरजकरनगर, स्टेट बँक काॅलनी यांचा समावेश हाेताे. प्रभाग १५ मध्ये नवीन रचनेनुसार काठे गल्ली, शंकरनगर परिसराला मुंबई नाका, पखालरोड परिसरही जोडला गेला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या प्रभागात एकूण लाेकसंख्या ४० हजार १४१ असून, त्यात अनुसूचित जातीचे हजार १९४ तर जमातीचे हजार २९६ इतकी लाेकसंख्या अाहे. प्रभागात मराठा, माळी अाणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य अाहे. त्यामुळे या तीनही समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार अाहे.

प्रभागात तीनपैकी दाेन जागा अनुक्रमे अाेबीसी अाणि जनरल महिला संवर्गासाठी अारक्षित अाहेत. त्यामुळे एकमेव खुल्या जागेसाठी प्रत्येक इच्छुकाला माेठीच ‘फिल्डिंग’ लावावी लागणार अाहे. या प्रभागात भाजपच्या वतीने अामदार वसंत गिते वा त्यांचे चिरंजीव प्रथमेश उभे राहण्याची शक्यता अाहे. तसेच दिवंगत अामदार गणपत काठे यांच्या परिवारातील सदस्यदेखील प्रमुख दावेदार असू शकताे. गेल्या वेळी शिवसेनेशी ताेडीची लढत देणारे अाणि मनसेतून भाजपमध्ये अालेले मिलिंद भालेराव, तसेच दीपक राऊत, गिरीश अाहेर यांचीही नावे सध्या चर्चेत अाहेत. महिलांच्या गटात मनसेतून भाजपमध्ये अालेल्या नगरसेविका अर्चना थाेरात वंदना शेवाळे, वसंत गिते यांची पत्नी शाेभा गिते, सुमन मधुकर भालेराव, गेल्यावेळी प्रभाग ५४ मधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या रेखा कैलास माेरे, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांची स्नुषा प्रिया मुनशेट्टीवार यांसह अनेकांची नावे चर्चेत अाहेत. शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सचिन मराठे यांची प्रमुख दावेदारी असेल. याशिवाय गाेरख वाघ यांची पत्नीदेखील उमेदवारी करू शकते. अन्य उमेदवारांचा शाेध मात्र घ्यावा लागणार अाहे. वसंत गिते यांनी मनसेला साेडचिठ्ठी दिल्यानंतर या पक्षात माेठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. याचा वचपा काढण्यासाठी मनसे अाता प्रभाग १५ मध्ये ताकद पणाला लावू शकते. परंतु, या पक्षात तूर्तास संदीप लेनकर अाणि गुलजार काेकणी या दाेघांचीच नावे चर्चेत अाहेत. अन्य पक्षांतील नाराजांना या पक्षातील उमेदवारीत स्थान मिळू शकते. राष्ट्रवादीकडून विशाल पवार अाणि लता वालझाडे या उमेदवारीवर दावा करू शकतात. याशिवाय तेजश्री काठे, गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणारे प्रशांत रकटे, अनिता रकटे यांसह बनकर परिवारातील एखादा सदस्य ही मंडळीदेखील उमेदवारीची समीकरणे जुळवू शकतात.
बातम्या आणखी आहेत...