आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूर: कारखाना सुरू झाल्यानंतरदेखील कामगारांची उपासमार कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामगार उपायुक्त दाभाडे यांच्याशी चर्चा करताना बीसीएलचे कामगार. - Divya Marathi
कामगार उपायुक्त दाभाडे यांच्याशी चर्चा करताना बीसीएलचे कामगार.
सातपूर - सातपूर अाैद्याेगिक वसाहतीतील बिझनेस कम्बाइन लिमिटेड (बीसीएल) कारखाना सुरू झाल्यानंतरही कामगारांची उपासमार टळलेली नाही. कंपनीत पूर्ण क्षमतेने काम करणाऱ्या कामगारांना दाेन-दाेन महिने वेतन दिले जात नसल्याने काम करूनही कंपनीतील १८० कामगार त्यांच्या कुटुंबीयांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ अाली अाहे. यासंदर्भात काही कामगारांनी शुक्रवारी (दि. ३) कामगार उपायुक्तांची भेट घेऊन ‘सांगा अाम्ही कसे जगायचे’ असा सवाल उपस्थित केला. 
 
बीसीएल कारखाना डबघाईला अाल्याने व्यवस्थापनाने २०१३ ते २०१५ मध्ये सुमारे १६ महिने ताळेबंदी जाहीर केली हाेती. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरुद्ध कामगारांनी एकजूट करून सातत्याने लढा दिल्याने जानेवारी २०१५ मध्ये कारखाना पूर्ववत सुरू करण्यात अाला. मात्र, कारखाना सुरू झाल्यानंतरही कामगारांमध्ये नाेकरीची शाश्वती नाही. त्यातच व्यवस्थापनाकडून वेतनही वेळेवर दिले जात नाही. वेळेवर वेतन व्हावे यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात अनेक बैठका हाेऊनही उपयाेग हाेत नाही. व्यवस्थापनाला कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळेच अामच्यावर उपासमारीची वेळ अाली असल्याची भावना कामगारांनी उपायुक्तांकडे व्यक्त केल्या. कामगारांना गेल्या दोन महिन्यांच्या थकीत वेतनासह नाेकरीची शाश्वती मिळावी, या मागणीसाठी कामगारांनी कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. यावेळी एस. के. लहिरे, डी. डी. बच्छाव, व्ही. आर. बच्छाव, जी. एच. सोनवणे आदींसह कामगार उपस्थित होते. 

कंपनी व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण कारणीभूत 
- कारखाना व्यवस्थापनाकडून वेळेवर वेतन दिले जात नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार उपायुक्तांच्या दालनात बैठका हाेऊनही व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे बैठका अयशस्वी झाल्या असून, कामगारांच्या पदरी निराशाच अाली अाहे.
-बी. एस. गायकवाड, कामगार प्रतिनिधी 
बातम्या आणखी आहेत...