आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : 15 काेटींचे ‘विद्याधन’ काम न करताच ‘मान्यवरां’च्या खिशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उत्तरपत्रिका स्कॅनिंगचा खर्च ११ कोटी तर त्या तपासण्याचा खर्च ४ कोटींच्या घरात आहे. परंतु, हा १५ काेटींचा खर्च वाचवण्यासाठी उत्तरपत्रिका न तपासताच ‘झटपट निकाल’ लावला जात असल्याचे यंदा उघडकीस अाले अाहे. सुमारे २५ विद्याशाखांच्या उत्तरपत्रिका तपासनीसांनीच याबाबतची तक्रार विद्यापीठाकडे केली असल्याने दरवर्षी हे १५ काेटींचे ‘विद्याधन’ नेमके जाते तरी कुणाच्या खिशात याबाबत विद्यापीठ वर्तुळात प्रचंड कुजबुज सुरू अाहे. त्यामुळे अतिशय जलद आणि पारदर्शक निकालासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा खुद्द कुलगुरूंचा दावा किती फोल आहे हे यामुळे उघड झाले आहे.  
 
दुसरीकडे विद्यापीठातील सुमारे २५ विद्याशाखांतील उत्तरपत्रिकाच तपासल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पदव्युत्तर असणे, तसेच विद्यापीठात शिक्षक असणेही बंधनकारक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठात उत्तरपत्रिका नेमके कोण तपासतात या प्रश्नाचे उत्तर विद्यापीठातील एकाही शिक्षकांकडे नसल्याचे दिसून येत आहे.  उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ज्या शिक्षकांची यादी परीक्षा नियंत्रकांकडे दिली जाते. त्यातील एकही शिक्षक उत्तरपत्रिका तपासत नसल्याच्या तक्रारी काही तपासनीसांनीच विद्यापीठाकडे केल्या आहेत. ४० लाख उत्तरपत्रिकांचा १५ कोटींचा खर्च हा कुणाच्या खिशात जातो? असाही प्रश्न उपस्थित होतो.
 
प्रत्येक उत्तरपत्रिकेची होते तपासणी
विद्यापीठातील ४० लाख उत्तरपत्रिकांचे आधी स्कॅनिंग केेले जाते. त्यानंतर  शिक्षकांकडून प्रत्येक उत्तरपत्रिकेची तपासणी होते. आधी टपालाने उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत तपासण्यासाठी पाठविल्या जात होत्या. त्याचा खर्चही मोठा होता. परंतु, आता हा खर्च आम्ही उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसाठी वापरत आहोत.
- अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक.
बातम्या आणखी आहेत...