आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवर्तनातून ३५ दलघफू, येवल्याचा महिन्यांचा पाणीप्रश्न सुटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला -  पालखेड डाव्या कालव्यातून सुटलेल्या आवर्तनातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या पाणी योजनेचा ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचा तलाव अर्धाअधिक भरला आहे. अजून दोन दिवसांपर्यत पाणी चालू राहण्याची शक्यता असून यावेळी पाण्याचा वेग अधिक असल्याने तलावात अधिक क्षमतेने पाणी येत आहे. शहराच्या साठवण तलावात ३५ दलघफू साठा झाला असून अजून १० दलघफू साठा करुन घेतला जाणार आहे. यातून शहरवासियांची तीन महिन्यांची तहान भागणार आहे. 
 
पालखेड डाव्या कालव्याला ८०० क्युसेकने सोडलेले पाणी अपेक्षित वेगाने पुढे येत आहे. डोंगळे काढल्याने तिसऱ्याच दिवशी पुरेशा प्रमाणात पाणी योजनांच्या तलावात आले आहे. शेततळे रिकामे झाल्याने आवर्तनातून मोठ्या प्रमाणात पाणीचोरीची शक्यता होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पाटबंधारे विभागाला डोंगळे काढण्याची मोहीम राबविण्यास सांगितले. स्वतः महसूलच्या इतर अधिकाऱ्यांना गस्त करायला लावल्याने प्रथमच विक्रमी संख्येने डोंगळे काढले गेले आहेत. त्यामुळे ३० तारखेला सायंकाळी पाणी सोडले गेले आहे. त्यातच कालव्याच्या लगतच्या शेतक-यांकड़ून पाणी उपसा होऊ नये यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या दोन्ही कारणामुळे मोठा फायदा झाल्याचे चित्र असून वेगाने कालव्याचे पाणी पुढे येत आहेत. 
 
धरणातून रविवारी (दि. ३० ) पाणी सोडल्यानतर मंगळवारी (दि.२) ते येथे पोहचले असून टेलला म्हणजेे कोटमगाव भागातील काही बंधारे भरून देऊन मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर ३८ गांव योजना या योजनांच्या साठवण तलावात पाणी दिले आहेत. आज पाणी सोडण्याचा तिसरा आहे. 

तीन दिवसात तीन मीटर पाणी 
^पाण्याच्यावेगअधिक असल्याने शहराच्या पाणी योजनेच्या तलावात तीन दिवसांत तीन मीटरवर पाणी आले आहे.पाणीचोरीस आळा बसल्याने अपेक्षित वेगाने पाणी येत आहे. -राहुलवाघ, मुख्याधिकारी, येवला 

पाटबंधारे विभागाला पाळावी लागणार दक्षता 
पिण्याच्यापाण्यासाठी पालखेडला दहा दिवसांचे आवर्तन सोडलेले आहे. पाण्याचा वेग पाहता मागणीप्रमाणे सर्वच योजनाना पाणी मिळेल असे चित्र आज आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले असले तरी त्यांना मर्यादा असल्याने काही ठिकाणी डोंगळे जोडून पाणी घेतले आहेत.अर्थात यालाही छुपा पाठिंबा असल्याचे खासगीत बोलले जात आहे.मात्र यावेळी अधिक दक्ष राहून विजपुरवठा खंडित केल्याने होणाऱ्या उपशावर काहीसा प्रतिबंध आला असल्याने पाणी वेगाने पुढे येत आहेत. मात्र आवर्तनाचे आता चार-पाच दिवस शिल्लक असून अजून योजनांसह काही गावांचे बंधारेही भरून द्यावयाचे आहेत,याचा विचार करुन पाटबंधारे विभागाला दक्षता पाळावी लागणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...