आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चला, कर्तव्यास जागूया, निर्भयपणे मतदान करूया, जनजागृतीची तरुण- तरुणींनी घेतली शपथ(महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘चला कर्तव्यास जागूया, निर्भयपणे मतदान करूया’, ‘आमचा हक्क, आमचे मत, चला करूया समृद्ध लोकशाही’, ‘मतदान करूया मिळून सारे, बजावूया आपला अधिकार....’ अशा विविध घोषवाक्यांतून नाशिकमधील तरुण- तरुणींनी मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला. निमित्त होते, युवा मतदार जागृती कार्यक्रमाचे... 

अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलातील पॉलिटेक्निक महाविद्यालयात युवा मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनींनी मतदानाविषयी प्रबोधनात्मक संदेश देणारे फलक हाती घेऊन तरुणाईमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 
या वेळी कॉलेजचे प्राचार्य विनायक निखाडे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. ‘प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याची संधी पाच वर्षांतून एकदाच मिळत असते. आपल्या अधिकाराचा वापर करून चांगल्या उमेदवारांच्या हातात विकासाची सूत्रे दिली पाहिजे’, असे सांगत विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
बातम्या आणखी आहेत...