आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनी गीतेतील तत्त्वज्ञान आणि काव्य समजून घ्यावे घळसासी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गीतेतील तत्त्वज्ञान आणि काव्य प्रत्येकाचे जगणे सुरेल बनविणारे आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान जड असल्याने या विचारधनापासून अनेकजण दूर आहेत. आजच्या युवा पिढीपर्यंत गीतेतील हे तत्त्वज्ञान सोप्या पद्धतीने पोहोचविण्याची गरज आहे. तरुणांनीही गीतेतील तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले. 
 
परशुराम साईखेडकर सभागृहात कै. सौ. सुधाताई बेळे पुरस्कार समिती आणि संस्कृत भाषा सभेच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घळसासी यांच्या हस्ते पुणे येथील डॉ. प्रज्ञा देशपांडे यांना कै. सुधाताई बेळे पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र तीन हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 
या प्रसंगी रमेश देशमुख, सरिता देशमुख, प्रसन्न बेळे, मधुरा बेळे, स्वानंद बेदरकर, मैथिली गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी घळसासी यांनी सांगितले की, करुणेने स्त्रीच्या त्यागाचे वर्णन करू नये, तर स्त्रीचा त्याग हा उजळणारा असतो. त्यातून प्रत्येकाला प्रेरणा जगण्याचे बळही मिळत असते. 

गीतेमधील तत्त्वज्ञान हे मोठे विचारधन असल्याने ते समजून घेण्याची गरज असून, जीवनात सुरेल बनविण्यासाठी तत्त्वज्ञान काव्याचा उपयोग करता येईल, असेही ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...