आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जापोटी उकळले 17 लाख, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - तीनलाख रुपये देऊन फ्लॅटच्या खरेदीचा व्यवहार करून किमान मर्यादेच्या साठेखताच्या माध्यमातून बँक आँफ महाराष्ट्रकडून कर्जापोटी १७ लाख रुपये बोगस बँक खात्यात वर्ग केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहिती बँकेच्या प्रबंधक वैशाली अतुल कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार, कुंभारवाडा, जुने नाशिक येथील केशव भास्कर चित्ते यांनी मोदकेश्वर येथे राहाणारे शैलेंद्र लक्ष्मण राठोड यांना जामीनदार करत मखमलाबाद येथील गुरुदत्त अपार्टमेंटमध्ये ३७ क्रमांकाचा फ्लॅट बोगस दस्तऐवज कागदपत्र तयार करून तो तारण ठेवून १७ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. विशेष म्हणजे बँकेकडून ज्यांच्या नावाने डीडी घेतला ते खातेही बोगस आहे. तसेच, संबंधित फ्लॅट दिवाकर डगळे यांनी हसमुखभाई चव्हाण (गुरुदत्त डेव्हलपर्स) यांच्याकडून १७ लाख ७१ हजार रुपयांना खरेदी केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...