आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील ‘मेक इन नाशिक’ला येणार याेगगुरू बाबा रामदेव, पतंजली उद्याेगाच्या अाशा पल्लवित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याेगगुरू बाबा रामदेव यांना ‘मेक इन नाशिक’साठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने निमंत्रण देताना रामेश्वर नाईक इतर. - Divya Marathi
याेगगुरू बाबा रामदेव यांना ‘मेक इन नाशिक’साठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने निमंत्रण देताना रामेश्वर नाईक इतर.
नाशिक- ‘मेकइन नाशिक’ या ३० अाणि ३१ मे राेजी मुंबईत हाेणाऱ्या उपक्रमाला पतंजली उद्याेग समूहाचे सर्वेसर्वा अाणि विख्यात याेगगुरू बाबा रामदेव भेट देणार अाहेत. उपक्रमाच्या संयाेजन समितीवर असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने रामेश्वर नाईक सहकाऱ्यांनी हरिद्वार येथे पतंजली अाश्रमात जाऊन बाबा रामदेव यांना या उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून ‘पतंजली’ अापला उद्याेग सुरू करणार असल्याच्या चर्चेला मूर्त स्वरूप या उपक्रमातून मिळेल किंवा मुख्ममंत्री नाशिककरीता अन्न कृषी प्रक्रिया उद्याेग विशेष अाैद्याेगिक क्षेत्र घाेषित करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात अाहे. 

नाशिकमध्ये नवे उद्याेग यावेत अाणि येथे उद्याेग-व्यवसाय वृद्धी व्हावी, राेजगारनिर्मिती त्यातून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे अायाेजन वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये अायाेजित करण्यात अाले अाहे. 
 
या उपक्रमातून किमान डझनभर उद्याेग तरी नाशिकमध्ये गुंतवणूक करतील अशी शक्यता असल्याचे चित्र अाहे. अाता या उपक्रमाच्या तयारीची लगबग निमा-क्रेडाई यांसारख्या स्थानिक संस्थांसह शासकीय पातळीवरही सुरू झाली अाहे. त्याचाच भाग म्हणून ११ एप्रिलला पालकमंत्र्यांनी उद्याेग विभागाचे सचिव अाणि एमअायडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासारख्या बड्या अधिकाऱ्यांची अाढावा बैठक बाेलावली अाहे. दुसरीकडे, बाबा रामदेव यांच्याकडेही पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी पाेहाेचले त्यांनी या उपक्रमाच्या उद‌्घाटन समारंभाला बाबा रामदेव यांनी उपस्थित राहण्याची विनंती केली, ज्याला सकारात्मक प्रतिसाद बाबा रामदेव यांनी दिला अाहे. 
 
देशातील सर्वात माेठ्या कृषी पतअाराखडा असलेल्या जिल्ह्यांपैकी नाशिक एक अाहे. येथे द्राक्ष, डाळिंब, स्ट्राॅबेरीचे उत्पादन शेतकरी जसे घेतात तसेच कांदा, नाचणी, तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी, साेयाबीन, मका, टाेमॅटाे यांसारखी पिकेही हाेतात. अाशिया खंडाचे कांद्याचे अागार म्हणूनही नाशिककडे पाहिले जाते. ‘वाइन कॅपिटल अाॅफ इंडिया’ असलेल्या नाशिक जिल्ह्यात काही भागात अाैषधी वनस्पतीही माेठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळे पतंजलीसह अन्न कृषी प्रक्रिया उद्याेग येथे येणे सहजशक्य अाहे, त्याला फक्त राज्य शासनाने बूस्ट देण्याची गरज वारंवार व्यक्त केली जात अाहे. त्याला या उपक्रमात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीमुळे हातभार लागणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...