आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन सोशल ग्रुपचा समाजासमाेर अादर्श, साेमाणी यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जैनसोशल ग्रुपच्या सदस्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी एक वेगळाच आदर्श ठेवला असून, नूतन कार्यकारिणीही तीच परंपरा सुरू ठेवेल, असा विश्वास इएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी व्यक्त केला. सन २०१७ साठी अध्यक्ष प्रणय संचेती त्याच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा राका ग्रीन स्क्वेअर येथे संपन्न झाला. 
 
मावळते सचिव संदीप कटारिया यांनी गतवर्षाच्या अहवालाचे वाचन केले. मावळते अध्यक्ष विजय लोहाडे यांनी गतवर्षाच्या प्रमुख कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, वर्ष २०१६ मध्ये जैन सोशल ग्रुपने ‘मिशन जलसेवा’ हा अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम घेतला होता. या अंतर्गत जैन समाज अन्य दानशूरांच्या मदतीने त्र्यंबक तालुक्यातील १० आदिवासी पाड्यांना ६० दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी अनेक कायमस्वरूपी कामे करण्यात आली. सोबतच चांदवड तालुक्यातही जलयुक्त शिवारासाठी नद्यांचे खोलीकरण रुंदीकरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण, पर्यावरण जागृतीसोबत सदस्यांसाठीही अनेक उपक्रम घेण्यात आले. 

पदग्रहण समारंभातील दुसरे प्रमुख अतिथी वास्तुविशारद संजय पाटील यांनीही जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमांची तारीफ करून स्वच्छ भारत अभियानातही सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या दरम्यान सिनेसृष्टीतील प्रख्यात नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या बहारदार नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. 

संस्थेचे सदस्य संदीप कटारिया, हेमंत दुगड, अमित कोठारी, पवन पटणी डॉ. सचिन कोचर यांना २०१६ वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबाबत अध्यक्षीय पुरस्काराने गौरविण्यात आले. शपथग्रहण अधिकारी सचिन गांग यांनी संचेती यांच्या टीमला शपथ दिली. संचेती यांनी येत्या वर्षात समाजासाठी जैन बांधवांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी मोहन बागमार, ललित मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

जैन सोशल ग्रुपची कार्यकारिणी 
माजीअध्यक्ष - अजय ब्रह्मेचा, सचिव - दिलीप पहाडे, उपाध्यक्ष - प्रवीण संचेती, सहसचिव - हेमंत दुगड अमित कोठारी, कोषाध्यक्ष - नीलेश भंडारी, जनसंपर्क अधिकारी - मुग्धा शहा भावना कासलीवाल , सल्लागार - मोहन बागमार ललित मोदी. 
बातम्या आणखी आहेत...