Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | news contravarcy about Women on Haj

‘मेहरम’ नसतानाही महिलांनी हजला जाण्यावरून नवा वाद, नवीन धोरणाचा विरोध

जहीर शेख | Update - Oct 12, 2017, 09:16 AM IST

हज यात्रेसाठी केंद्र सरकारने २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता नवीन धोरण आखण्यासाठी नेमलेल्या समितीने सुचवलेल्या शिफारशींना म

 • news contravarcy about Women on Haj
  नाशिक- हज यात्रेसाठी केंद्र सरकारने २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता नवीन धोरण आखण्यासाठी नेमलेल्या समितीने सुचवलेल्या शिफारशींना मुस्लिम समाजातून विरोध होऊ लागला आहे. हज हा इस्लामच्या पाच मुख्य स्तंभांपैकी एक असून, धार्मिक बाबतीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप चालवून घेणार नाही, असा इशारा मुस्लिम संघटनांकडून मुंबई येथे झालेल्या पहिल्या बैठकीत देण्यात आला आहे.

  ४५ वर्षीय महिलांना मेहरम नसतानाही हजला जाण्यास परवानगी देण्याच्या शिफारशीवरून मुख्यत्वे हा नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘तीन तलाक’बाबतचा मुद्दा त्यावरून निर्माण झालेला वाद शमत नाही, ताेच हज धोरणाच्या रूपाने नवीन वाद उभा होण्यास सुरू झाली आहे. रझा अकॅडमीसह राज्यातील विविध भागातील उलेमा मौलानांच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात देशभरात आंदोलन उभे करण्यासाठी नियोजन करण्यात आले. हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आतापर्यंत सौदी अरेबियाला करीता एकूण २१ ठिकाणांहून विमान पकडण्याची सुविधा देण्यात येत होती. मात्र, आता या संख्येत कपात करत समितीने ही संख्या वर आणली असल्याने तसेच जहाजाने जाण्यास प्राधान्य देण्याचे सुचविण्यात अाले असल्याने त्याला मुस्लिम संघटनांकडून विराेध केला जाणार आहे.

  केंद्र सरकारची धोरणे इस्लामच्या धार्मिक बाबतीत, शरीयतमध्ये हस्तक्षेप करणारी असल्याचे मत मुस्लिम धर्मगुरूंकडून व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत यात्रेकरू महिलांना पुरुष मेहरमशिवाय (ज्यांच्याशी लग्न करता येत नाही असे पुरुष - वडील, भाऊ, मुलगा वगैरे) म्हणजेच एकट्याने गटाने प्रवास करण्यास मुभा नव्हती. मात्र या मसुद्यात महिला यात्रेकरू चार महिलांच्या गटाने यात्रा करू शकतील, अशी शिफारस करण्यात आली आहे. प्रत्येकास व्हिसा अनिवार्य करण्यात अाला अाहे. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

  समितीने सुचविलेल्या शिफारशी
  केंद्रसरकारने नियुक्त केलेल्या सहा सदस्यीय समितीने सादर केलेल्या प्रस्तावित हज धोरणाबाबतचा मसुदा तयार केला आहे. माजी सनदी अधिकारी अफझल अमानुल्लाह हे या समितीचे प्रमुख आहेत. या मसुद्यात त्यांनी ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिला यात्रेकरूंना पुरुषाविना प्रवास करण्याची मुभाही देण्याची शिफारस, महिला यात्रेकरू महिलांच्या गटाने यात्रा करू शकतील, हज यात्रेकरूंना देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात यावे, हजसाठी देशात २१ ठिकाणांहून विमान पकण्याची सोय आहे, ती वर आणावी, सर्व ठिकाणी हज हाऊसची निर्मिती करण्यात यावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. तर हज यात्रेकरूंसाठी विमान उड्डाणाच्या ज्या जागांची शिफारस करण्यात आली आहे, त्यात दिल्ली, लखनाै, कोलकाता, अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोची अशा ठिकाणांचा समावेश आहे.

  आधुनिक जहाजांतून प्रवास, विमान उड्डाणात घट
  भारतातूनदरवर्षी एकूण एक लाख ७० हजार यात्रेकरून हज यात्रेसाठी जात असतात. हज यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी आतापर्यंत सौदी अरेबियाला जाण्यासाठी एकूण २१ ठिकाणांहून विमान पकडण्याची सोय करण्यात येत होती. मात्र, आता या संख्येत मोठी घट करत समितीने ही संख्या वर आणली आहे. तर भाविकांना आधुनिक जहाजांतून प्रवास करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. यामधून ते हजार लोकांना एकाच वेळी नेण्यात येणार आहे. मुंबई ते जेद्दाह हे तब्बल हजार २६० किमी अंतर कापून हे जहाज दोन ते तीन दिवसांत भाविकांना इच्छितस्थळी पोहोचवणार आहे. पूर्वीच्या जहाजांसाठी या प्रवासाला १२ ते १५ दिवस इतका कालावधी लागत होता. त्यामुळे विमान उड्डाणात घट होणार आहे.

  ...अन्यथा देशपातळीवर अांदाेलन
  देशाचे हज यात्रेसंदर्भातील धोरण ठरवणाऱ्या या महत्त्वपूर्ण समितीत इस्लामच्या अभ्यासकांचा समावेश करण्याऐवजी सनदी अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. एकूणच इस्लामबाबत हज यात्रेबाबत पुरेशी माहिती नसलेल्यांनी मांडलेल्या शिफारसी मुस्लिम समाज कसा स्वीकारणार. सरकारने हजच्या नवीन धोरणासंदर्भातील या शिफारशी फेटाळाव्यात, अन्यथा या विरोधात देशपातळीवर आंदोलन करण्यात येईल.
  - हजरत सईद रझा नुरी, सचिव, रझा अकॅडमी

Trending