आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुक्त’ विद्यापीठाचा घाेळ : घोटाळे लपविण्यासाठी अाता ‘बीआेडी’ला ‘तारीख पे तारीख’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संकेतस्थळ, अभ्यासक्रम, बोगस पदाेन्नत्यांसह परीक्षा विभागात काेट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची दखल शासनाकडून घेतली जाणे अपेक्षित असताना त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. या घोटाळ्यातील सर्व कागदपत्र व्यवस्थापन समिती (बीआेडी)कडे मांडणार अशी भूमिका कुलगुरूंनी घेतली. मात्र, बीआेडी बैठकीचे नियोजन केले जात नसल्याने आता कुलगुरू इ. वायुनंदन यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाशी संबंधित कोट्यवधींचा घाेटाळा उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्यांची साधी चौकशीही लावण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. 
 
कुलगुरू इ. वायुनंदन यांनी विद्यापीठाचा कार्यभार सांभाळल्यानंतर अनेक गैरव्यवहार उघडकीस अाणले. यात विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी तयार केलेल्या ycmou.ac.in या वेबसाइटच्या कामात लाखो रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणात वेबसाइट बनविणाऱ्या कंपनीने देखभालीची सेवा माेफत देणे अावश्यक हाेते. मात्र, त्याएेवजी देखभालीसाठी दरवर्षी सुमारे १० लाख याप्रमाणे वर्षांचे ५० लाख रुपये मुक्त विद्यापीठाकडून उकळण्यात अाल्याचे उघडकीस अाले अाहे. बी.एस्सी. या अभ्यासक्रमासाठी पुस्तके पूर्ण करता विद्यापीठाकडून लाखो रुपये घेण्यात आले. याप्रकरणी विज्ञान अाणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक मनोज किल्लेदार यांच्याकडून संचालकपदाचा पदभार काढून घेण्यात आला अाहे. त्यानंतर विज्ञान अाणि तंत्रज्ञान विभागातील कोर्ससाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चर्स याेजनेंतर्गत तयार केलेल्या व्हिडिआे लेक्चर्समध्येही १० लाखांहून अधिक रकमेचा घोटाळा झाला. एका व्हिडिआे लेक्चरचे हजार तर त्या लेक्चरच्या टेक्निकल स्पॉटसाठी हजार रुपये विद्यापीठाकडून घेण्यात आले अाहेत. अशा शंभरहून अधिक लेक्चर्सचे पैसे विद्यापीठाकडून घेण्यात अाले. विशेष म्हणजे हे लेक्चर्स विद्यापीठाच्या माजी संचालकांच्या कंपनीमार्फत तर नुकताच पदभार काढलेल्या संचालकांच्या मुलींकडून तयार करण्यात अाल्याची बाबदेखील उघडकीस आली. तसेच परीक्षा विभागातही ४० लाख उत्तरपत्रिकांच्या छपाईला एका प्रतीसाठी रुपये असा दरही ठरला हाेता. प्रत्यक्षात मात्र काेऱ्याच उत्तरपत्रिका हाती पडल्याने तब्बल ८० लाख रुपये जास्त अदा केल्याचे उघडकीस अाले अाहे. त्याचबरोबर ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्या आहेत. तसेच, या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसंदर्भातही कुठलीही माहिती परीक्षा विभागाकडे नाही. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ज्या विद्यार्थ्यांना एका विषयात जेवढे गुण मिळाले तेवढेच गुण दुसऱ्या विषयात देण्यात आले. तर एम.ए.च्या अभ्यासक्रमाच्या नुसत्या बैठकांवर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. अशा गंभीर स्वरूपाचे घोटाळे उघडकीस आलेले असतानाही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासंदर्भात चौकशी समिती गठीत करणे तसेच या घोटाळ्यातील सर्व कागदपत्र व्यवस्थापन समिती (बीआेडी)कडे मांडणे गरजेचे असताना अशी कुठलीही प्रक्रिया अद्याप झालीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 
 
‘बीआेडी’ची बैठक होऊ नये यासाठी प्रयत्न 
मुक्त विद्यापीठात झालेल्या कोटींचे घोटाळे तसेच उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या घोळची माहिती व्यवस्थापन समिती (बीआेडी)ला मिळू नये, याकरिता विद्यापीठातील काही संचालकांकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे गेल्या महिन्यात २८ जुलैला होणारी व्यवस्थापन समिती (बीआेडी)ची बैठक ऑगस्टला ढकलण्यात आली होती. मात्र, सर्व घोटाळ्यांच्या बातम्या वातावरण पाहता जोपर्यंत आदिवेशन सुरू आहे तोपर्यंत बैठक घ्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...