आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन अायुक्त म्हणतात, सर्वच समस्यांवर उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचे नूतन अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी दुपारी वाजेच्या सुमारास कार्यभार स्वीकारला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बहुचर्चित कपाटांचा विषय छेडला असता सर्वच समस्यांची उत्तरे असतात, असे सांगून या विषयावर अभ्यासाअंती उपाय शाेधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेचे अतिरिक्त अायुक्त म्हणून काम करताना अशा प्रकरणांत प्रीमियम अाकारून उत्पन्नात वाढ करण्यात अाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेचे मावळते अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी अापल्या निवासस्थानीच अभिषेक कृष्णा यांना अायुक्तपदाचा कार्यभार दिला. मुंबईच्या विक्रीकर विभागात सहअायुक्त म्हणून डाॅ. गेडाम यांची बदली झाली असून, त्यांच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांना कार्यभार देण्यात अाला अाहे. कृष्णा हे साेमवारी नाशिक पालिकेत रुजू हाेणार हाेते. परंतु, त्यांनी शुक्रवारीच पालिकेत प्रवेश करीत सर्वांना अाश्चर्याचा धक्का दिला. यावेळी नूतन अायुक्तांनी खातेप्रमुखांचा अाेळख-परिचय करून घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अापली भूमिका विशद केली. बांधकाम क्षेत्रातील कपाटाच्या मुद्याची अापल्याला कल्पना असून, त्याचा सविस्तर अभ्यास मी करणार अाहे. फक्त त्यासाठी काही वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक समस्येवर उत्तर असते, ते शाेधावे लागते असे सांगत कृष्णा म्हणाले की, गत अायुक्तांनी घेतलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करतानाच काही वेगळ्या संकल्पनांवरही काम केले जाणार अाहे. स्वच्छ पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन मलनिस्सारण या तीन मूलभूत बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येणार अाहे. अधिकारी वा अन्य गैरव्यवहारांबाबतच्या चाैकशा नियमाप्रमाणे पुढे चालूच राहणार अाहे.

{ गैरव्यवहारांच्या चाैकशा पुढे चालूच राहणार
{ नाशिकचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यासाठी प्रयत्न
{ यापूर्वीच्या अायुक्तांच्या निर्णयाची करणार अंमलबजावणी
{ स्वच्छ पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन अाणि मलनिस्सारण या तीन बाबींवर भर
{ महापालिकेच्या हितालाच प्राधान्य

डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीवर साधली चुप्पी
अायुक्त डाॅ. गेडाम यांची बदली अाणि त्याचे शहरात उमटलेले पडसाद यावर कृष्णा यांना मत विचारले असता त्यांनी बदली ही प्रशासकीय बाब असल्याचे सांगत बाेलणे टाळले. माझी चार वर्षांत चार वेळा बदली झाल्याचे सांगत शासनाच्या अादेशाचे पालन करणे अामचे कर्तव्यच असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील पार्किंगची समस्या साेडविण्यासाठी समन्वय साधणार
परिवहन महामंडळात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मला पार्किंगच्या समस्येची तीव्रता माहीत अाहे, असे सांगत अायुक्त म्हणाले की, पाेलिस अाणि महापालिका प्रशासन यांच्या जबाबदाऱ्या वाहतुकीच्या बाबतीत वेगवेगळ्या असतात. या दाेन्ही विभागात समन्वय असल्यास प्रश्न तातडीने सुटू शकताे. हा समन्वय साधण्याचे काम मी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटीबाबत साेमवारी बैठक
नाशिकचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगत याबाबत येत्या साेमवारी खातेप्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याचे अायुक्तांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...