आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषीथॉन प्रदर्शनात सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉलधारकांना पाच दिवस प्रदर्शन हे बुस्ट ठरले आहे. 'कृषीथाॅन'मध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने कृषी उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरल्याचे चित्र आहे.

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स यांच्या विद्यमाने त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर डोम येथे २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान कृषीथॉन प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देश-विदेशातील नामवंत कृषीक्षेत्रातील उद्योजक, व्यासायिक, निर्यातदार, कृषिनिविष्ठा, औजारे उत्पादक आणि पुरवठादार सहभागी झालेले होते. या दरम्यान देश-विदेशातील शेतकरी, कृषीसंबंधी उद्योजक, व्यावसायिक, पशुपालक, कृषीक्षेत्रातील निर्यातदार, कृषी पदवीधर, विद्यार्थी, प्रयोगशील शेतकरी, अभ्यासकांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातील स्टॉलवर असलेल्या कृषीपूरक वस्तू, औजारे, साहित्याची खरेदी, आगाऊ नोंदणी केली. त्यामुळे सुमारे ३०० स्टॉलधारकांना कृषीथॉन व्यवसाय विस्तारासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शनामध्ये पाच दिवसांत विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर शेतीसंबंधी अद्ययावत तंत्रज्ञानाचे शेती उपयोगी मशिनरी, कृषिनिविष्ठा, शेतीपूरक व्यवसायांचे साहित्य, औजारे यांचे स्टॉल सादरीकरण आणि विक्रीसाठी होते. यामुळे भेट देणाऱ्यांना कृषीथॉन प्रदर्शन हे एक नावीन्यपूर्ण यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यास हातभार लावत होते, शेतीपूरक सर्व बाबी एकाच छताखाली असल्याने आणि त्या संबंधी माहिती देणारे उपक्रम येथे झाले. पाच दिवसांमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून झाली असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. कृषीथॉनमध्ये बीटूबी मींटिग्ज या उपक्रमात कृषीसंबंधी उत्पादनांच्या कंपन्या आणि या कंपन्यांचे उत्पादन वितरित करण्यास इच्छुक असलेले वितरक, विक्रेत्यांचा मेळावा झाला. कंपन्या आणि त्यांचे वितरक, यांचे जाळे विस्तारण्यात मदत झाली. त्याचबरोबर इंडो-इटालियन, इंडो-अमेरिकन या कार्यक्रमात जे चर्चासत्रे झाली, त्यात भारताबरोबर अमेरिका आणि इटालियन कंपन्यांचे कृषीसंबंधी असलेल्या उत्पादन करारांनुसार निर्मिती करण्यात आलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीची माहिती शेतकऱ्यांना कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली. त्याचबरोबर या कंपन्यांच्या स्टॉलमध्ये त्याची विक्री आणि आगाऊ नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली होती. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण हे प्रदर्शन ठरले असल्याचा विश्वास संजय न्याहारकर यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...