आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेट्रो ब्लड बँकेने आजवर वाचविले शेकडो रुग्णांचे प्राण, एक वर्षात हजार ९९५ रक्तपिशव्यांचे केले वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त विकत घेणे गरीब रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने जिल्हा रुग्णालयासह, खासगी आणि महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शासकीय दरात आणि वेळेत रक्त दिल्याने या गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची मेट्रो ब्लड बँक अमृतवाहिनी ठरली आहे. विशेष म्हणजे एबी पॉझिटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णांनाही रक्तपिशवी वितरित करण्यात अाली अाहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रसूत झालेल्या मातांचा समावेश आहे. मेट्रो ब्लड बँकेतून या प्रसूत मातांना मोफत रक्त दिले जाते. खासगी रुग्णालयाने उपचार नाकारणाऱ्या या गर्भवती महिलांची येथे नैसर्गिक प्रसूती होत असल्याने रुग्णालयात परजिल्ह्यातील गरोदर महिलाही येथे दाखल होतात. या सर्व मातांना मोफत रक्त दिले जाते. यासह जिल्हा रुग्णालयातील इतर विभागात दाखल रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. पालिकेच्या बिटकाे, इंदिरा गांधी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना शासकीय दरात म्हणजे अवघ्या ४५० रुपयांत रक्त बॅग वितरित केली जाते. हे रक्त खासगी रक्तपेढीत हजार ४५० रुपयांत मिळते. यासह सिकलसेल, थॅलेसेमिया, हिमोफेलिया या रुग्णांना लागणारे रक्तही मोफत दिले जाते. रुग्णांना रक्ताची चणचण निर्माण होऊ नये याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पवनकुमार बर्दापूरकर, जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे आणि ब्लड बँकेचे अधिकारी, कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात.

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ५,३३९ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. यापैकी ६,९९५ पिशव्या वितरित झाल्या. ८७ शिबिरांत ५,३३९ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. रुग्णांच्या गरजेनुसार रक्तपेशी विलगीकरण आणि प्लेटलेट तयार केल्या जातात. गरीब रुग्णांसाठी मेट्रो ब्लड बँक खऱ्या अर्थाने अमृतवाहिनी ठरत आहे.

रुग्णांना माफक दरात रक्त उपलब्धता
^गरीबरुग्णांनामोफत आणि इतर रुग्णांना माफक दरात रक्त वितरित केले जाते. अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. गरीब रुग्णांना रक्तटंचाई भासू नये याकरिता जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे. -डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

सिव्हिलमुळे वाचले प्राण
^रक्तघेण्यासाठीसर्व रक्तपेढ्यांत फिरलो. मात्र, रक्त मिळत नव्हते. परिचितांनी सिव्हिलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. खासगी रुग्णालयात रुग्ण असल्याचे त्यांना सांगितले. हाती पैसे कमी होते तरी सिव्हिलमध्ये विश्वासावर रक्तपिशवी मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचले. -सचिन शेरताटे, वणी
बातम्या आणखी आहेत...