आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत उघड्यावर मांसविक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको -सिडकाे प्रभाग सभेत उघड्यावरील मांसविक्री अतिक्रमणांच्या प्रश्नावर खडाजंगी हाेऊनही महापालिका प्रशासन ढिम्म असल्याचे चित्र आहे. या सभेत प्रशासन अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक आक्रमक झाले होते. अधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली हाेती.

अंबड लिंकरोडवरील सिम्बायाेसिस महाविद्यालयासमाेरचा भाग, पवननगर, अंबड, त्रिमूर्ती चौक, कामटवाडेरोड, विजयनगर, पाथर्डी फाटा आदी भागांत उघड्यावर मांसविक्री सुरू आहे.सिडकाेतील अनेक ठिकाणी मांसविक्रेते खराब मांस कचरा उघड्यावरच टाकून देतात. त्यामुळे रोगराइला आमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी अनेक श्वान हे मांस खाण्यासाठी जमा होतात त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उघड्यावरील मांसविक्रीने परिसराचेही विद्रुपीकरण हाेत आहे. ही विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा - सिडकोतील सर्वच भागांत अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढीव बांधकामे तसेच रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्रिमूर्ती चौक भागात अनेक भाजीविक्रेते थेट रस्त्यावरच भाजी विकण्यासाठी बसतात त्यामुळे सायंकाळी या ठिकाणी उंटवाडी पुलापासून तर थेट पाथर्डी फाट्यापर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. अनेक दूधविक्रेते स्वीट मार्टच्या दुकानांमुळे अनेक ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. या सर्व प्रकारचा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

कारवाई लवकरच
-सिडकाेतीलअतिक्रमण उघड्यावरील मांसविक्री करणाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त जादा वाहने घेतली जातील. आर.आर. गोसावी, विभागीयअधिकारी, सिडको