आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा स्पंदन महोत्सवात सीएमसीएस कॉलेजचे यश , बारा केंद्रांवर पार पडली प्राथमिक फेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मविप्रसंस्थेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शैक्षणिक वर्ष सुरू झालेल्या युवा स्पंदन महोत्सवाची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. मविप्र युवा स्पंदन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सी.एम.सी.एस महाविद्यालयाने एकूण अाठ कलाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावले.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २८ सप्टेंबर ते शनिवार दि. ऑक्टोबर रोजी संस्थेच्या १२ केंद्रीय महाविद्यालयांमध्ये पार पडल्या. प्राथमिक फेरी ही तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती. युवा स्पंदन स्पर्धेत अभिनय कौशल्य, संगीत, नृत्य अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. संगीत प्रकारातील क्लासिकल, व्होकल सोलो, क्लासिकल ट्रान्समेंटल सोलो, नॉन परक्युसन, लाइट व्होकल, वेस्टर्न व्होकल सोलो, वेस्टर्न ग्रुप साँग, फोक ऑर्केस्ट्रा अशा अाठ प्रकारांतून स्पर्धा घेण्यात आली. नृत्यक्षेत्रात क्लासिकल डान्स, फोक ट्रायबल डान्स अशा दोन नृत्यप्रकारात पार पडली. अभिनय क्षेत्रात एकांकिका, लघुनाटिका, मूक अभिनय, मिमिक्री अशा चार प्रकारांमध्येही स्पर्धा पार पडली. सीएमसीएस कॉलेजमधील स्पर्धेचे उद‌्घाटन संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अंतर्गत कृषी, कृषी तंत्रनिकेतन, समाजकार्य सी. एम. सी. एस. या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, वादन अभिनय अशा एकूण १४ कलाप्रकारांत सक्रिय सहभाग नोंदविला.

परीक्षक म्हणून शुभांजली पाडेकर रामेश्वर धोंडगे यांनी काम बघितले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, कलामंडळ प्रमुख प्रा. प्रशांत बनकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. सागर चित्ते, प्रा. रूपाली वाघ, प्रा. प्रतीक्षा पिंगळे, प्रा. संदीप रायते यांनी प्रयत्न केले.

डिसेंबरमध्ये अंतिम फेरी
मविप्रसंस्थेच्या अॅड. विठ्ठलराव हांडे बी.एड कॉलेज, सिन्नर कॉलेज, नांदगाव कॉलेज, सटाणा कॉलेज, ताहाराबाद कॉलेज, वणी कॉलेज, निफाड कॉलेज, पिंपळगाव कॉलेज, त्र्यंबकेश्वर महाविद्यालय, मेडिकल कॉलेज सिडको महाविद्यालय, सी.एम.सी.एस महाविद्यालय येथे प्राथमिक फेरी पार पडली. युवा स्पंदनची अंतिम फेरी डिसेंबर महिन्यात होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...