आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील महिन्यात दहा दिवस राहणार बँका बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुलै महिन्यात नऊ दिवस बँका बंद राहणार अाहेत. त्यापैकी रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीसह दाेन शनिवार अाणि पाच रविवार, कर्मचारी संपाचे दाेन दिवस यांचा समावेश असेल. स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या सहयाेगी पाच बँकांच्या विलीनीकरणाचा विराेध म्हणून एक दिवस या बँकांतील कर्मचारी संपावर जाणार अाहेत, तर दुसऱ्या दिवशी सगळ्या बँकांतील अधिकारी कर्मचारी संपावर जाणार अाहेत.

बारा दिवस बँका बंद राहणार असल्याचे मेसेजेस व्हॉट्सअॅपवर फिरत असून, ग्राहकांची माेठी अडचण हाेणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात बारा नाही तर दहा दिवस बँका बंद राहाणार अाहेत. जुलै रविवार, जुलै ईद, जुलै पहिला शनिवार, १० जुलै रविवार, तर १२ जुलैला स्टेट बँकेच्या सहयाेगी बँक कर्मचाऱ्यांचा संप, १३ जुलैला इतर बँकांतील कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप, १७ जुलै रविवार, २३ जुलैला चाैथा शनिवारची २४ अाणि ३१ जुलैला रविवारची अशा दहा दिवस सुट्या असतील. दरम्यान, महिन्याच्या दुसऱ्या अाणि तिसऱ्या अाठवड्यात चारच दिवस बँकांचे कामकाज चालणार अाहे. चाैथ्या अाणि पाचव्या अाठवड्यात पाच दिवस कामकाज सुरू असेल.

१२ जुलै राेजी इतर बँका राहणार संपात सामील
स्टेट बँक अाॅफ इंडियात ज्या पाच सहयाेगी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय अाहे, त्यांतील कर्मचारी १२ जुलैला संपावर असतील यामुळे स्टेट बँक अाॅफ पटियाला, स्टेट अाॅफ हैदराबाद, स्टेट बँक अाॅफ बिकानेर-जयपूर, स्टेट बँक अाॅफ त्रावणकाेर, स्टेट बँक अाॅफ म्हैसूरचे कर्मचारी संपावर असतील, या दिवशी इतर बँका मात्र सुरू राहतील.

दाेन दिवस अालटून पालटून असणार संप
मुळात चार रविवार अाणि दाेन शनिवार बँकांची नियमित सुटी अाहे. ईदची एक दिवस सुटी असेल, एक दिवस स्टेट बँकेच्या सहयाेगी बँक कर्मचाऱ्यांचा संप, तर एक दिवस इतर बँक कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा म्हणून लाक्षणिक संप केला जाणार अाहे. गिरीश जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष, अाॅल इंडिया बँक अाॅफिसर्स असाेसिएशन
बातम्या आणखी आहेत...