आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील अाठवड्यात राज घेणार झाडाझडती, मनसेचे उपनेते नांदगावकर मुंबईकडे रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पक्षाची दयनीय अवस्था झाली असताना गटबाजी थांबत नसल्याचे बघून हवालदिल झालेले मनसेचे उपनेते बाळा नांदगावकर हे नगरसेवकांशी चर्चा करून तयार केलेला अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देणार अाहेत. नांदगावकर बुधवारी मुंबईला रवाना झाले असून पुढील अाठवड्यात झाडाझडती नाराजांचे मनाेमिलन ठाकरे घडवून अाणतील असा अंदाज व्यक्त केला जात अाहे.

महापालिका निवडणूक सात महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेतील अंतर्गत संघर्ष थांबलेला नाही. पक्षाची वाताहत सुरूच असून, अाता जेमतेम २० नगरसेवक बाकी असताना त्यांच्यातही पदांवरून संघर्ष सुरू अाहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी नांदगावकर यांना विशेष जबाबदारी देत नाशिकमधील हालहवाल जाणून घेण्यासाठी पाठवले. त्यांनी नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर महत्त्वाची पदे, कंत्राटे देताना विश्वासात घेतले नसल्यासारखे अाराेप केले. त्यानंतर नांदगावकर यांनी सर्वांना एकत्रित करून डिनर डिप्लाेमसीच्या निमित्ताने मनाेमिलनाचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी विद्यार्थी संघटनेची बैठक घेऊन निवडणुकीला एकत्रित सामाेरे जाण्याचे अावाहन केले. या दरम्यान नगरसेवक विद्यार्थी संघटनेला विश्वासात घेत नसल्याची तक्रारही युवा पदाधिकाऱ्यांनी केली. दुपारी नांदगावकर हे मुंबईला रवाना झाले असून गुरुवारी ते राज यांच्यासमाेर नाशिकचा अहवाल देतील. त्यानंतर ठाकरे हे स्वत: नगरसेवक पदाधिकाऱ्यांशी एकत्र चर्चा करून झाडाझडती घेण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...