आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढील वर्षापासून हाेणार वाणिज्यदरानुसार कर वसुली, कर बुडवेगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील मोक्याच्या जागांवरील निवासी इमारतींचा व्यवसायासाठी वापर होत असताना पालिका मात्र अशा व्यावसायिकांकडून वाणिज्यएेवजी रहिवासी दरानुसार घरपट्टी वसूल करीत असल्याची बाब सत्ताधा-यांनी आता गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात महापौर अशाेक मुर्तडक यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना दोन दिवसांपूर्वी सूचना केली आहे. खासगी संस्थेमार्फत मिळकतींची क्षेत्र तपासणी केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे मुर्तडक यांनी सांगितले.
पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना हक्काचा महसूल बुडत असल्याचे बघून महापौर, उपमहापौरांनी प्रत्येक इमारतीतील प्लाॅटच्या क्षेत्रमोजणीपासून त्याच्या वापराची तपासणी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. या पार्श्वभूमीवर आता खासगी संस्थेमार्फत प्रत्येक मिळकतीचे फेरमूल्यांकन करून घरपट्टी वसुलीसाठी पाउले उचलली जात आहे. महापालिकेत गेल्या महिनाभरापासून नगरसेवकांची कामे निधीअभावी ठप्प झाल्यामुळे नगरसेवक आयुक्तांचे खटके उडू लागले आहेत. यापूर्वी अनेक महासभांत मिळकतींची फेरमोजणी करून घरपट्टी वसुलीची मागणी करण्यात आली. उपमहापौर होण्यापूर्वी अपक्ष गटनेते असताना गुरमित बग्गा यांनीही वाढत्या शहराच्या विचाराने वाढीव बांधकामांची मोजणी करून घरपट्टी आकारणीची मागणी केली होती. विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी औद्योगिक वसाहतीतील कंपन्या तसेच मोठ्या हॉटेल्सच्या क्षेत्राची मोजणी करून सुधारित घरपट्टी वसुलीची मागणी केली होती. त्यावेळी तीन हॉटेल्सकडून क्षेत्र दडवून घरपट्टीची कशी चोरी होते हेही दाखवून दिले होते.
एकलाख मिळकती गायब : महापालिकेच्यारेकाॅर्डवर तीन लाख मिळकती असून, आयुक्तांनी घेतलेल्या एका आढाव्यात ही संख्या चार लाखापर्यंत पाेहचेल, असा अंदाज अधिका-यांनीच व्यक्त केला. या एक लाख मिळकती रेकॉर्डवर आल्या, तर काेट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे. त्यादृष्टीने खासगी संस्थेमार्फत सॉफ्टवेअरद्वारे मिळकत सर्वेक्षणाची बाब प्रस्तावित आहे.

येथे हाेताे वापर
गंगापूररोड,काॅलेजरोड, महात्मा गांधीरोड, रविवार कारंजा, शालिमार, कॅनडा काॅर्नर, पंडित काॅलनी त्याचप्रमाणे नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी भागातील महत्त्वाच्या रस्त्यालगतच्या इमारती.

उत्पन्नवाढीसाठी मनसेचे प्रयत्न
पालिकेच्याउत्पन्नात वाढ करण्यासाठी व्यावसायिक वापर होत असलेल्या मिळकतींचे खासगी संस्थेकडून सर्वेक्षण करून सुधारित दराने घरपट्टी वसूल करण्याचा पर्याय पुढे आला आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली आहे. - अशोकमुर्तडक, महापौर