आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात पुढील वर्षी राष्ट्रीय याेग स्पर्धा, १२०० याेगपटूंच्या सहभागाची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्हा याेगा कल्चर असाेसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये डिसेंबर महिन्याच्या १७ तारखेपासून जिल्हास्तरीय अांतरशालेय अाणि २२ डिसेंबरपासून अांतरमहाविद्यालयीन याेग स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले अाहे, तर पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात प्रथमच राष्ट्रीय याेग स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उमेश शर्मा यांनी दिली.
नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जगभरात याेगशिक्षणाबाबतची उत्सुकता वाढत असताना अापल्या देशातही अाता याेगाबाबत सजगता वाढत असल्याचे दिसून येत अाहे. बालपणापासूनच अापल्या मुला-मुलींना याेग प्रशिक्षणास प्राेत्साहित करण्याकडे पालकांचा कल वाढू लागला अाहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात याेग प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत गत दाेन-तीन वर्षात अनेक पटींनी वाढ हाेऊ लागली अाहे. नाशिकचे वातावरण, तर याेगासारख्या प्रशिक्षणासाठी वर्षभर अत्यंत अादर्श स्वरूपाचे मानले जाते. त्यामुळे नाशिकला याेग विद्यापीठ सुरू करण्याची मागणीदेखील राष्ट्रीयस्तरावर करण्यात अाली अाहे. या सर्व पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नाशिकला राष्ट्रीय स्पर्धेची मागणी करण्यात अाली हाेती. ही मागणी मान्य झाली असून, ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत नाशिकमध्ये पहिली राष्ट्रीय स्पर्धा हाेणार अाहे. नाशकात अशा स्वरूपाची राष्ट्रीय स्पर्धा प्रथमच हाेणार अाहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नाशिकमध्ये याेगपटूंचा कुंभमेळाच भरणार असून, नाशिक शहर याेगपटूंच्या केंद्रस्थानी येणार अाहे. राष्ट्रीय स्पर्धा तितक्याच दिमाखदार पद्धतीने भरविण्याचा प्रयत्न हाेणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अाणि मंत्राज ग्रीन रिसाेर्सेसचे संचालक उमेश शर्मा यांनी नमूद केले.

जिल्हा स्पर्धेपासून हाेणार प्रारंभ
यंदाच्या राज्य अाणि राष्ट्रीय स्पर्धेच्या पात्रतेसाठी खेळाडूंना डिसेंबर महिन्यात हाेणाऱ्या जिल्हा स्पर्धांमध्ये चमक दाखवावी लागेल. त्यामुळे या स्पर्धेतही दमदार कामगिरी करता यावी, यासाठी खेळाडूंना सर्व प्रकारचे मार्गदर्शन संस्थेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा पाटील यांनी सांगितले. जिल्हास्तरीय स्पर्धेलाही माेठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत किमान १२०० याेगपटू सहभागी हाेतील, असा विश्वास उपाध्यक्ष व्हीनस वाणी यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...