नाशिक- उत्तरोत्तरचढत गेलेल्या रात्रीसमवेत बहरत गेलेली शॉपिंग, असे अनोखे चित्र शनिवारी नाशिकमध्ये पाहायला मिळाले. कॉलेजरोड येथील, पाटील लेन नं 4, अमरानंद हाउस येथील ‘सर्वांगी’ साडी दालनाने आयोजित केलेल्या सर्वांगी शॅपिंग नाइट या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनसोक्त शॅपिंगचा आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकातील या प्रकारच्या पहिल्याच प्रयोगाचा महिलांनी लाभ घेतला. दिवसाच्या व्यस्त कामातून शॅपिंगला वेळ काढता येत नसल्याने सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री मनसोक्त साड्यांची खरेदी या उपक्रमामुळे करता आल्याचे महिलांनी या वेळी सांगितले. शॅपिंग करताना हातात पडणारा गरमागरम मसाला दुधाचा प्याला अन् स्नॅक्स शॅपिंगचा आनंद वाढविताना दिसून आले. ३१ ऑक्टोबरपर्यंत येथे ग्राहकांना प्रत्येक तासाला लकी ड्रॉच्या माध्यमातून कॅश कूपन जिंकता येत असल्याने हा आनंद द्विगुणीत होत आहे. १८ ऑक्टोबरला पुन्हा याच पद्धतीने शॅपिंग नाइटचे आयोजन करण्यात येणार असून, सकाळी दहा ते पहाटे एक वाजेपर्यंत येथे शॅपिंग करता येणार आहे. आर्ट सिल्क, ड्रेस मटेरियल, कॉटन साडी, पैठणी, वर्कसाडी, सिल्क साड्या, ब्रायडल कलेक्शन यांसारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध असल्याचे संचालक अपूर्व भांडगे आणि कृष्णा भांडगे यांनी सांगितले.‘सर्वांगी’मध्ये शनिवारी रात्री महिलांचा साडी खरेदीसाठी असा उत्साह दिसून आला. १८ तारखेला पुन्हा अशा शॉपिंगचे आयोजन होणार आहे.