आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘निमा’च्या अविराेध निवडणुकीसाठी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील उद्याेगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा)च्या निवडणुकीकरिता उमेदवारांच्या चाचपणीसाठी बैठका सुरू झाल्या अाहेत. सन २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकप्रक्रियेत निमाच्या कार्यकारिणीची अविराेध निवड झाली हाेती. ताेच कित्ता यंदाही गिरविला जावा यासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. नव्या कार्यकारिणीत काम करायला इच्छुक असलेल्यांची चाचपणी बैठकांतून सुरू झाली अाहेे. सत्ताधारी एकता पॅनलची अशीच एक बैठक गुरुवारी ‘निवेक’ येथे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निमाची मागील निवडणूक सन २०१४ मध्ये झाली हाेती, ही निवडणूक अविराेध करण्यात यश अाले हाेते, त्याकरिता विविध बैठका घेतल्या गेल्या. पहिल्या वर्षासाठी माेठ्या उद्याेग गटातून निवडून अालेल्या प्रतिनिधींना अध्यक्षपदाची संधी हाेती, तर दुसऱ्या वर्षी लघुउद्याेजकांच्या प्रतिनिधींना संधी हाेती. त्यानुसार सन २०१४-२०१५ या वर्षाकरिता मार्समन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रवी वर्मा यांची अध्यक्षपदी अविराेध निवड करण्यात अाली हाेती. यानंतर सन २०१५-२०१६ करिता निमाच्या घटनेनुसार संजीव नारंग यांची वर्णी अध्यक्षपदासाठी लागली हाेती.

सन २०१६-२०१८ या यंदाच्या निवडणुकीकरिताही पहिल्या वर्षी माेठ्या उद्याेग गटाच्या निवडून अालेल्या प्रतिनिधींना अध्यक्षपदाची संधी मिळणार असली तरी त्याकरिताचा चेहरा काेण असेल, याबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत अाहे. दरम्यान, चाचपणीकरिता ‘निवेक’ येथे झालेल्या बैठकीत कार्यकारिणी सदस्य अाणि पदाधिकाऱ्यांच्या पदांकरिता काेण काेण इच्छुक अाहेत, याची चाचपणी करण्यात अाली. यावेळी चार माजी अध्यक्षांसह विद्यमान पदाधिकारी उपस्थित हाेते, असे समजते. दरम्यान, खरे चित्र शुक्रवारीच स्पष्ट हाेऊ शकणार अाहे. या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...