आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘निमा’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर, २९ जुलैला मतदान, २७५० सभासद करणार मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनचा (निमा) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला अाहे. त्यानुसार गरज पडल्यास २९ जुलै राेजी मतदान हाेणार असून, ३० जुलैला मतमाेजणी हाेणार अाहे. नवे अध्यक्ष ३१ जुलैला पदभार स्वीकारतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी काम पाहत असून, त्यांना विवेक गाेगटे अाणि जे. एम. पवार साहाय्य करणार अाहेत. लवाद म्हणून एन. टी. अहिरे काम पाहत अाहेत.
दर दाेन वर्षांनी निमाच्या अध्यक्ष पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाते. यंदा या प्रक्रियेत २७५० सदस्य मतदार म्हणून अापला हक्क बजावणार अाहेत. माेठ्या उद्याेग गटातून यंदा अध्यक्षपद राखीव अाहे. याशिवाय, दाेन उपाध्यक्ष (लहान माेठे उद्याेग गट प्रत्येकी एक), मानद सरचिटणीस (काेणत्याही उद्याेग गटातून), दाेन सरचिटणीस ( लहान माेठे उद्याेग गट प्रत्येकी एक) अाणि खजिनदार (एक जागा, काेणत्याही उद्याेग गटातून) अशा पदाधिकाऱ्यांच्या सात जागांसाठी, तर नाशिक तालुक्यातून (माेठे उद्याेग गट), २० ( लहान उद्याेग गट), सिन्नर तालुका (माेठे उद्याेग), ( लघुउद्याेग गट) अशा ३० कार्यकारिणी समिती सदस्यांच्या जागेकरिता ही निवडणूक हाेत अाहे.

निवडणूक कार्यक्रम : उमेदवारीअर्ज विक्री जुलैपासून, मतदार यादी दुरुस्तीकरिता जुलै ही अंतिम मुदत, १३ जुलै राेजी सायंकाळी वाजेपर्यंत दुरुस्तीसह मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार अाहे. वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी १५ जुलै राेजी प्रसिद्ध केली जाईल. १६ जुलै राेजी सायंकाळी वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत, अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी २४ जुलै राेजी, गरज पडल्यास २९ जुलै राेजी मतदान घेतले जाईल.
बातम्या आणखी आहेत...