आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nima Industry Election Issue At Nashik, Divya Marathi

‘निमा’ पदाधिका-यांच्या सात जागांसाठी 23 अर्ज, वैध उमेदवारांची यादी जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 39 जागांकरिता 70 अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत. अर्जांच्या छाननीनंतर गुरुवारी वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर नजर टाकली असता पदाधिका-यांच्या नऊ जागांसाठी तब्बल 23 अर्ज दाखल झाले असून, 22 जुलै रोजी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
सात पदाधिकारी, 30 कार्यकारिणी सदस्य आणि दोन तालुका प्रतिनिधी अशा 39 पदांकरिता 28 जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी किशोर राठी आणि रवी वर्मा यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज, तर उपाध्यक्षपदासाठी (मोठे उद्योग गट) किशोर राठी यांचा एकमात्र अर्ज दाखल झाला आहे. उपाध्यक्षपदासाठी (लघु उद्योग गटातून) पाच अर्ज दाखल करण्यात आले असून, या जागेकरिता के. आर. बूब यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. संजीव नारंग, राजेंद्र छाजेड आणि मंगेश पाटणकर यांनीही प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जनरल सेक्रेटरी पदाकरिता विद्यमान जनरल सेके्रटरी (सर्वसाधारण गट), मंगेश पाटणकर यांच्यासह मिलिंद राजपूत, व्हिनस वाणी, हर्षद ब्राह्मणकर, समीर पटवा यांचे, तर मोठे उद्योग गटातून सी. डी. कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. लघु उद्योग गटाकरिता ज्ञानेश्वर गोपाळे, उदय खरोटे, आशिष नहार, के. आर. बूब, व्हिनस वाणी यांनी अर्ज सादर केले आहेत. खजिनदार पदाकरिता गजकुमार गांधी, विरल ठक्कर आणि समीर पटवा यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
कार्यकारिणी सदस्य पदांसाठी संजय सोनवणे, अखिल राठी, अनिल बाविस्कर, मनीष रावल, मिलिंद राजपूत, राजेंद्र वडनेरे, सतीश कोठारी, शैलेश नारखेडे, शशिकांत जाधव, श्रीकांत नावंदर, उदय रकिबे, सुभाष छोरिया, मोहन सुतार, मनोज पिंगळे, सुधाकर देशमुख, बी. एस. हासे, कुरेश बादशाह, भारत येवला, तेजपाल बोरा, अरुणा जाधव, कैलास सोनवणे, हर्षद ब्राह्मणकर, नीरज बदलानी, गजकुमार गांधी, व्हिनस वाणी, विजयकुमार गुप्ता, आशिष नहार, संजय सोनवणे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. सिन्नर येथील कार्यकारिणी सदस्य पदाकरिता श्रीहरी नावंदर, अजय बेदमुथा, किरण खाबिया, सुधीर बडगुजर, टी. एन. अग्रवाल, संदीप भदाणे, एस. के. नायर, नारायण पाटील, रवींद्र राठोड, किरण वाघ, उत्तम दोंदे यांचे, तर अतिरिक्त उपाध्यक्ष पदाकरिता अरुण चव्हाणके, सुनील बागुल, शिवाजी आव्हाड, अतिरिक्त सेके्रटरी पदाकरिता आशिष नहार, सुभाष कदम, अरुण चव्हाणके यांचे अर्ज वैध ठरले आहेत.