आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमाच्या विविध उपसमिती पदाधिकाऱ्यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक इंडिस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या विविध उपसमित्यांकरिता पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्ण य घेण्यात आला.

असोसिएशन आणि उद्योजक जगतात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या निमा विश्वस्त समितीच्या अध्यक्षपदी निशिकांत अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. एकूण २७ नवीन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
तज्ज्ञ समितीवर मनोज पिंगळे, समीर भुतानी, सुरेश माळी आणि संतोष मंडलेचा, विशेष निमंत्रित म्हणून एचएएलचे कार्मिक व्यवस्थापक एम. ए. हाफिज, राजेंद्र छाजेड, मनीषा धात्रक, तनुजा यार्दी, उदय खरोटे, श्रीकांत बच्छाव, संदीप सोनार आणि सुनील बागुल यांची निवड करण्यात आली आहे. निमंत्रित सदस्यपदी समीर पटवा, ज्ञानेश्वर गोपाळे, एच. बी. हासे, सिन्नरमधून रवी राठोड यांची निवड करण्यात आली आहे. या समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विकासात्माक दृष्टिकोनातून काम करणार असल्याची निर्धार व्यक्त केला.
मोठ्या उद्योगांचाही झाला यंदा समावेश
यंदा निमाच्या कार्यप्रणालीत खऱ्या अर्थाने मोठ्या उद्योगांचा समावेश झाला आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांना संघटनेत सक्रिय करण्यावर भर देण्याच नूतन अध्यक्ष रवी वर्मा यांनी दिलेला शब्द खरा ठरला आहे. ग्लेनमार्कचे किरण पाटील, बॉशचे मोहन पाटील, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे हिरामण आहेर आणि बेदमु‌था वायर्सचे अजय बेदमु‌था यांचाही निमंत्रित सदस्यांत समावेश आहे.

काही समित्या व त्यांचे चेअरमन असे
अखिल राठी (बुलेटनि), मनीष कोठारी (इतर संघटनांशी समन्वय), प्रदीप बूब (निधी सक्षमीकरण आणि प्रायोजकत्व), हर्षद ब्राम्हणकर (निर्यात आणि विदेश संपर्क), गजकुमार गांधी ( ग्रीव्हन्स), विजयकुमार गुप्ता (आरोग्य), सुधाकर देशमुख (निमा हाऊस आणि लायब्ररी), मनोज िपंगळे (कर सुविधा), संजीव नारंग (कायदा), व्हीनस वाणी (पायाभूत सुविधा) आदी.