आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nirmal City Make Through Public Private Partnership

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सार्वजनिक-खासगी सहभागातून साकारु ‘निर्मल शहर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सुमारे१५ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरासाठी पाच हजार स्वच्छतागृहांची गरज असताना, सध्या जेमतेम एक हजार स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय झाली आहे. ‘निर्मल शहर’ या संकल्पनेतून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) सीएसआर अॅक्टिव्हिटीतून चांगल्या स्वच्छतागृहांची उभारणी, व्यवस्थापन यशस्वीपणे हाताळणा-या बंगळुरू पुण्यासारख्या शहरांचा कित्ता गिरवला तर नाशिकमध्येही सार्वजनिक स्वच्छतागृहांची समस्या सुटू शकते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाला तर जागतिक आरोग्य संघटनेने शौचालये वा त्यातील सीट्सचे व्यक्तीमागे असलेले प्रमाणही ठाऊक नाही. ‘४० व्यक्तींमागे एक सीट’ असे ढोबळ परिमाण आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. शहरात केवळ १०७ प्रसाधनगृहे (मुता-या) आहेत. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ११ हजार लोकांमागे एक अशी संख्या आवश्यक आहे.