आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Will Be Present On Mns Programme In Nashik

राज यांनी मोदींवर जबरी टीका केल्यानंतरही गडकरी मनसेच्या व्यासपीठावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने चर्चेत आलेले राज ठाकरे येथील गोदापार्कच्या भूमिपूजनासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. उद्या (शनिवारी) होणा-या भूमिपूजनाचे उद्घाटन भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मोदींवर टीका केल्यानंतर भाजप आणि मनसे यांच्यात बिनसले असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता गडकरी उपस्थित राहणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे काल सायंकाळीच नाशिक शहरात दाखल झाले. आज सकाळी ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. आज सायंकाळी शिर्डीहून परतल्यावर राज गोदापार्क आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा करणार आहेत. मात्र त्याआधीच राज चर्चेत आले आहेत. गेल्या महिन्यात नाशिकमध्येच नरेंद्र मोदींवर जहरी टीका केल्यानंतर भाजप आणि मनसेचे संबंध बिघडल्याची चर्चा सुरू होती. नाशिकमधील भाजप पदाधिका-यांनी तर नाशिक महापालिकेतून बाहेर पडण्याची इच्छा राज्य नेतृत्त्वाकडे व्यक्त केली होती. मात्र, भाजपाने संयमाचा सल्ला दिला होता. आता राज यांनी गोदापार्कच्या भूमिपूजनला नितीन गडकरींना बोलविले आहे. गडकरी यांनी आमंत्रण स्वीकारून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांत सगळं काही ठीक असल्याचा संदेश देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नविन राजकीय समीकरणे जुळली तर नवल वाटू नये, असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.
नाशिकमध्ये गोदापार्क उभारण्याचे राज यांचे स्वप्न आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्सच्या पुढाकाराने हे गोदापार्क साकारले जाणार आहे.