आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NMC Standing Commity Action Against Privet Practitioner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी प्रॅक्टिसवर कारवाई; स्थायी समितीकडून बिटको रुग्णालयाची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - पालिकेच्या बिटको रुग्णालयातील असुविधा, समस्या व नागरिकांच्या तक्रारींबाबत वैद्यकीय अधिकारी डी. बी. पाटील हेच खातेप्रमुख म्हणून जबाबदार असल्याने त्यांच्यासह नोकरीत राहून खाजगी प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी असल्याने स्थायी समिती सभा अधर्वट सोडून सदस्यांनी शनिवारी दुपारी अचानक रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी डॉक्टर खाजगी दवाखाने चालवून रुग्णांची पळवापळवी करतात, स्वच्छता, डॉक्टरांची गैरहजेरी, अतिदक्षता विभागात एसी बंद, पाण्याची समस्या असे प्रकार दिसून आले. याचा अहवाल आयुक्तांना सादर करून डी. बी. पाटील यांच्यासह खाजगी प्रॅक्टीस करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

नवीन रुग्णालय बांधकामासाठी तीन वर्षाची मुदत असून वर्षभरात ठेकेदाराला दिलेल्या रकमेच्या तुलनेत समाधानकारक काम नाही. अद्याप त्याचा पाया खोदलेला नाही.

नातेवाईक, रुग्ण ताटकळत

पाहणी सुरू असताना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश नव्हता. सर्व जण रुग्णालयाच्या परिसरात उन्हात ताटकळत उभे होते. त्यामुळे अनेकांना मानसिक त्रास झाला.

येथे केली पाहणी

बिटको रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून शौचालय, अतिदक्षता विभाग, पुरुष, महिला वॉर्ड, औषधालय, ओपीडी, एक्स-रे, ऑपरेशन विभागाची पाहणी

रुग्णालयाच्या कामांवर लोंढे, पाटील नाराज

नूतन रुग्णालयाच्या कामांच्या पाहणीदरम्यान आजपर्यंत अदा रकमेइतके काम झाले नसल्याने नाराजी व्यक्त केली. मनपा अधिकार्‍याने माहिती देण्याऐवजी बांधकाम ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीची माहिती ऐकून घेण्यास दिनकर पाटील, प्रकाश लोंढे यांच्यासह सदस्यांनी नकार दिला. ही जबाबदारी मनपा अधिकार्‍यांची असल्याचे सांगताना आता याची सभागृहात चर्चा होईल असे सांगून पाहणी दौरा अर्धवट सोडून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

यांनी केली पाहणी

उद्धव निमसे, डॉ. विशाल घोलप, बाळासाहेब सानप, अशोक मृर्तडक, दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, संभाजी मोरुसकर, दामोदर मानकर, विक्रांत मते, हेमंत गोडसे, आर. डी. धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुनील वाघ, वैशाली दाणी, संगीता गायकवाड, हरिष भडांगे