आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी रद्द झाला पण, सामान्यांना फायदा शून्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पन्नास कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांचा एलबीटी रद्द झाला असला तरी त्याचा फायदा सर्वसामान्यांना अद्याप झाल्याचे चित्र नाही. एलबीटी रद्द होऊनही किराण्यापासून पेट्रोलपर्यंत ज्या वस्तूंचे दर ३१ जुलैला होते, तेच दर ऑगस्टलाही कायम आहेत. सर्वसामान्यांना या करमाफीचा फायदा देण्यासाठी व्यापारी संघटनांकडून पाऊले उचलण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या व्यापारी संघटनांनी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा आदेश घेण्याची गरज आहे.

एलबीटीविरोधात आंदोलन करताना व्यापारी संघटनांकडून मात्र, कोणताही कर लादला गेला, तर तो शेवटी जनतेच्याच खिशातून जातो, याकडे लक्ष वेधले जात होते त्यांनाही आंदोलनात सहभागी करून घेतले जात होते. अडीच वर्षांच्या आंदोलनाच्या काळात याचमुळे जनता व्यावसायिकांच्या पाठीशी होती. ‘व्यापारी समाज’चा दबाव गट त्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जागा दाखविण्याचे आव्हान देण्याची हिंमतही त्यामुळे आंदोलनकर्त्या व्यापारी संघटनांनी दाखविली होती. जनतेनेही व्यापारी समाजाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यात सत्तापरिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जनता पक्षानेही दिलेल्या आश्वासनाला जागत काही अंशी का होईना, एलबीटी रद्द केला, मात्र त्याचा फायदा केवळ व्यावसायिकांना झाला असून सामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची भावना जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.

दोन दिवसांत बैठक घेणार
येत्या दोन दिवसांत महासंघाच्या अंतर्गत असलेल्या सर्व व्यावसायिक संघटनांची बैठक होईल. ज्यात या संदर्भातील निर्णय होईल. जनतेला करमुक्तीचा फायदा मिळेलच.
प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष, फाम

जनतेला फायदा हाेणार
सोलापूरकरांचा निर्णय खरोखर चांगला आहे. आपल्याकडेही अशी बैठक घेण्यात येईल जनतेला थेट फायदा कसा होईल, याकडे लक्ष दिले जाईल.
संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी ठेवला आदर्श
सोलापूरच्या चेंबर ऑफ कॉमर्सने एलबीटी रद्द होताच तातडीने बैठक घेतली. त्यात आपल्या सदस्य व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार आता प्रत्येक दुकानात वस्तूंचे दरपत्रक झळकणार असून, एलबीटीपूर्वीची त्या वस्तूंची किंमत सध्याची किंमत प्रसिद्ध केली जाणार आहे. यातून काय दिलासा मिळाला, हे सर्वसामान्यांना समजणार आहे.

बैठक घेऊन दरपत्रक लावण्याचे आवाहन करणार
आम्हीदेखील आमच्या घाऊक धान्य व्यापारी संघटनेच्या सदस्यांची बैठक बोलाविणार आहोत. त्यात दरपत्रक लावण्याबाबत आवाहन करणार आहोत. याच बैठकीत घाऊक धान्यांचे दरपत्रक लावण्याचे आवाहन करणार आहोत. -
राहुल डागा, घाऊक धान्य व्यापारी संघटना
बातम्या आणखी आहेत...