आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Banned Mobile In Collage, High And Techniqual Education Minister Tope Say

महाविद्यालयात मोबाइल बंदी नाहीच, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांची माह‍िती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाविद्यालयात मोबाइल बंदी करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नसल्याची स्पष्टोक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. त्यामुळे मोबाइल बंदीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
महाविद्यालयांमध्ये मोबाइल बंदी करणे किंवा जॅमर लावण्याची सक्ती याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग विचार करत असल्याची चर्चा काही दिवसांपासून झडत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा वापर प्रचंड वाढल्यामुळे त्याचा परिणाम शैक्षणिक वातावरणावर होत असल्यामुळेच अशी बंदी घालण्याच्या विचारात शासन असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात याबाबत टोपे यांना विचारले असता अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्या विचाराधीन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयांमध्ये मोबाइलचा वापर वाढल्यामुळे काही पालकांनी याविषयी तक्रारी केल्या असतील. त्या पार्श्वभूमीवर विभागाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून अभिप्राय मागविले होते. याचा अर्थ आम्ही मोबाइलवर बंदी घातली असा होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरणही टोपे यांनी दिले.