आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भाई’चे बॅनर लावणारी गणेश मंडळे अाता रडारवर, पोलिस प्रशासनाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशाेत्सवावर महापालिका निवडणुकीचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांच्या माध्यमातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून फलकबाजीतून चमकोगिरी हाेण्याची शक्यता असून असे करणाऱ्यांसह ‘भाईं’बरोबर झळकणाऱ्यांवर पोलिसांची ‘नजर’ राहाणार आहे. फलकांवर ‘भाईं’चे फोटाे लावल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे मंडळाला अर्थ आणि मसल पॉवर देणाऱ्या भाईंसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे.
गणेशाेत्सवामध्ये नागरिकांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून बॅनरवर भाईंचे फोटाे लावणाऱ्या मंडळांवर कारवाईचे संकेत दिले आहे. यासह राजकीय पक्षांच्या फलकांवर गुन्हेगारांचे फोटाे असल्यास अशा नेत्यांनाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक लढवू इच्छित बाहुबली नेत्यांसह ‘भाईं’कडून मंडळांना रसद पुरवली जाणार आहे. त्यामुळे या भाईंचे ऋण फेडण्यासाठी मंडळांकडून फलकावर फोटाे लावले जाण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे.
विद्रुपीकरणाचा गुन्हा : परवानगीघेता फलक लावणारे मंडळ शुभेच्या देणाऱ्यांवर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा अधिनियमानुसार पालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

..तर चाैकशी करणार
मंडळांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या भाईंची गोपनीय माहिती घेण्यात येणार आहे. कारवाई करण्यात आलेले पोलिस कारवाई सुरू असलेले गुन्हेगार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाईंच्या संपर्कात असलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन कारवाई केली जाणार आहे. - लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपआयुक्त परिमंडळ
बातम्या आणखी आहेत...