आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थानिमित्त प्रहर विसंगत प्रशासकीय रागदारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रशासनाधिकारी अनेकदा केवळ माैनराग अाळवत असतात हे नवीन नाही. त्यामुळेच शास्त्रीय संगीतातील राग त्यांच्या गावीही नसतात हे वेगळे सांगायला नकाे. याचीच प्रचिती शहरात सध्या चाैका-चाैकांतील ध्वनिक्षेपकांद्वारे सुरू असलेल्या ‘प्रहर विसंगत’ रागदारीतून येत अाहे. सकाळच्या वेळी, दुपारी गायला जाणारा राग, तर दुपारी, रामप्रहरी गायला जाणारा राग अशा विसंगत सुरावटींमुळे या अधिकाऱ्यांची संगीताबद्दलची नसलेली जाण चांगलीच उघड हाेत अाहे.

कुंभमेळ्याची वातावरणनिर्मिती अाणि नागरिकांना सूचना करण्यात याव्या, यासाठी शहरातील महत्त्वाच्या चाैका-चाैकांत ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात अाली अाहे. ध्वजाराेहणावेळी यावर भजने अाणि भक्तिगीते वाजविण्यात अाली. सध्या मात्र तसा कुंभमेळ्याचा काेणताही उत्सव नाही. त्यामुळे या भाेंग्यांद्वारे कधी भजने, कधी अभंग, तर कधी अनेक राग एेकविले जात अाहेत. शास्त्रीय संगीतात दिवस-रात्रीच्या प्रहराला फार मोठं महत्त्व आहे. प्रत्येक रागाची, गाण्याची आणि ऐकण्याची वेळ ठरलेली आहे. प्रहराप्रमाणेच नव्हे तर ऋतुप्रमाणेही राग आहेत. ते वातावरण त्या-त्या वेळेच्या रागांच्या सुरांमध्ये उतरलेलं असतं.. म्हणून काही राग सकाळचे, काही दुपारचे, काही रात्रीचे, काही विविध ऋतूंचे असतात असे अापली परंपरा सांगते आणि ती पाळली गेली पाहिजे हेदेखील अनेक तज्ज्ञ शास्त्रीय गायक सकाळच्या प्रहरी शास्त्रीय संगीतातील ललत राग, भटियार, भैरव, तोडी, हिंडोल यामधील संगीत सुरू राहिल्यास मन प्रसन्न राहील. तर, दुपारच्या वेळी मुलतानी, सारंग अाणि सायंकाळी त्यानंतरही मारवा, पुरिया कल्याण, पुरिया धनश्री हे राग ऐकवले पाहिजेत. तर, रात्री यमन कल्याण, मारु बिहाग राग अशा प्रकारे संगीत एेकायला हवे. तसेच श्याम कल्याण हा उत्सवाचा राग असल्याने तोही यात असावा. याबराेबरच जर तबला, ढाेलकी, सतार, बासरी या वाद्यांचे साेलाेवादन एेकवले तर तेदेखील भाविकांचे तसेच श्राेत्यांचे मन प्रफुल्लित करणारे ठरेल.

सिंहस्थ कुंभपर्वात संगीत ऐकवण्याची कल्पना चांगली आहे. भक्तिमय शास्त्रीय संगीताने मन प्रसन्न राहते. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्येही संगीताचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताचे तत्त्व समजून घेऊन त्याप्रकारे संगीत असायला हवे. तसेच तालवाद्यांसह इतर संगीताचाही मिलाफ झाल्यास कुंभपर्वाची वातावरणनिर्मिती, तर हाेईलच, पण ते अाराेग्यासाठीही उत्तम राहील. वैद्यविजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक, आयुर्वेद संगीत उपचार तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...