आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Elabiti, No Oktroya The Determination Of Commerce

नो एलबीटी, नो ऑक्ट्रॉय व्यापार्‍यांनी केला निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक'-‘नो एलबीटी, नो ऑक्ट्रॉय’चा निर्धार करीत शहरातील व्यापार्‍यांनी येत्या मंगळवारी (दि. 28) शहरात व्यापारी परिषदेचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ र्मचंट्सच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार असून, राज्यातील 26 महापालिकांचे 500 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत सरकारला रोखठोक इशारा देण्याचा निर्धार व्यापार्‍यांनी बुधवारी लेवा पाटीदार भवन येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

बैठकीला व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राज्य सरकारने मूल्यवर्धित कर लागू करताना जकात कर असणार नाही, असे आश्वासन राज्यातील व्यापार्‍यांना दिले होते. मात्र, तरीही केवळ जकात हटवून एलबीटी लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे महापालिका व व्यापारी दोघेही संकटात आले आहेत. म्हणूनच 31 जानेवारीपर्यंत एलबीटी हटावावा आणि जकातीसारखा पर्यायही नसावा, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

फामचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या अध्यक्षतेखाली ही राज्यस्तरीय परिषद होणार असून, जो पक्ष एलबीटी काढण्याचे आश्वासन देईल, त्याला आगामी काळात होणार्‍या लोकसमा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पाठिंबा देण्याचे निश्चित केले जाणार असल्याचे फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

बैठकीस नेमिचंद कोचर, नरसिंहभाई पटेल, नरेंद्र बोरा, जितेंद्र बोरा, राजन दलवानी, राहुल डागा, परेश बोधानी, मनोज वढेरा, मदन पारख यांच्यासह विविध प्रकारच्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.