आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Electricity Bill , Loan Installment Collection CM Fadanvis

वीज बिल, कर्ज हप्ता वसुलीचा तगादा नाही- मुख्‍यमंत्र्यांचा गारपीटग्रस्तांना दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतक-यांनी चिता रचून आंदोलन केले.
नाशिक - शेतक-यांचे सरकार असल्याने कोणताही अन्याय होऊ देणार नाही. तसेच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज हप्त्यासाठी आणि वीज बिलासाठी शेतक-यामागे तगादा न लावण्याचे आदेश देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

अधिवेशन सुरू असल्याने बाहेर घोषणा करता येत नाही म्हणून सोमवारी अधिवेशनात घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर नाशिक जिल्ह्यात वडनेर भैरव येथे फडणवीस यांनी शेतक-यांशी संवाद साधला.

या योजनांची ग्वाही
> गारपीट, अवकाळीचा सामना करण्यासाठी शाश्वत शेतीसाठी द्राक्ष, डाळिंब, फुलशेतीला नेटखाली आणण्यासाठी योजना
> सध्याच्या पीक विमा योजनेत बदल करून नव्याने पीक विमा योजना सुरू करण्यात येईल.

१० तास चितेवर आंदोलन
पूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतक-यांनी चिता रचून आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय माघार घेणार नसल्याचा त्यांचा निर्धार होता. तहसीलदारांनी त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणली. जिल्हाधिका-यांना भेटीसाठी पाठवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यावर दहा तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
पथकाची आजपासून मराठवाड्यात पाहणी
औरंगाबाद | दुष्काळाच्या पाहणीसाठी दहा जणांचे पथक शहरात दाखल झाले. विभागीय आयुक्तालयात त्यांनी दीड तास आढावा घेतला. आयुक्त संजीव जैस्वाल यांनी परिस्थितीचे सादरीकरण केले. सोमवारी एक पथक पैठण तालुक्यात मुरुमा येथे, तर दुसरे सटाणा येथे पाहणी करील. या वेळी अमरावतीचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, नाशिकचे एकनाथ डवले, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, सीईओ दीपक चौधरी उपस्थित होते. पीकस्थिती, पाऊस आकडेवारी, पाणीटंचाईची माहिती त्यांनी घेतली. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांसह वाशिम, यवतमाळला पथक पाहणी करणार आहे.

नाथसागरात २.५% वाढ
पैठण | चार दिवसांपासून मुळा धरणातून जायकवाडीत ५,५०० क्युसेक पाणी आले असून, साठा २.५१ टक्क्यांनीच वाढला आहे. सध्या भंडारदरातून ७०९८ क्युसेकची आवक सुरू आहे. हे पाणी अजून दाखल झालेले नाही. जायकवाडीचा पाणीसाठा २७.६ वरून २९.६५ टक्के झाला आहे.
मुळाचे पाणी येण्यापूर्वी जायकवाडीत २७.०६ टक्के साठा होता. त्यात २.५१ टक्क्यांची भर पडली आहे.