आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याबराेबर बत्तीही हाेणार गुल, अजब शक्कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराला अाठवड्यातून एक दिवस पाणी बंदचा सामना करावा लागत असताना अाता पाणीपुरवठ्याच्या काळात महापालिकेने ‘महावितरण’ला वीजपुरवठा थेट बंद ठेवण्यासाठी साकडे घातले अाहे. त्यामुळे एेन उन्हाळा परीक्षेच्या काळात वीजपुरवठा बंद राहून ‘राेगापेक्षा इलाज भयंकर’ ठरणार अाहे. पालिकेकडे माेटारी जप्त करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या उणिवेवर पांघरूण घालण्यासाठी शक्कल लढवल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी पहाटे तर काही ठिकाणी सायंकाळी वीजपुरवठा खंडित हाेणार अाहे.

नाशिकच्या इतिहासात प्रथमच गंगापूर धरणाच्या अखेरच्या थेंबापर्यंत पाण्याचे अारक्षण ठेवले असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीबचतीसाठी कठाेर उपाययाेजनांना सुरुवात केली अाहे. त्याचाच एक भाग पाणीपुरवठ्याच्या काळात वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय अाहे. अर्थात, महासभेत अशी शक्कल लढवण्याची शिफारस नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीच केली हाेती. त्यामागचा उद्देश, या काळात माेटारीद्वारे काेणी पाणी पळवू नये असाही हाेता.
मंगळवारच्या महासभेत पाणी प्रश्नावर बरीच चर्चा झाल्यानंतर महासभेने पाणीकपातीचे सर्वाधिकार अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना सुपूर्द केले. मात्र, त्यामुळे अाता पाण्याचा प्रश्न अधिक चिघळला झाला तर त्याचा ठपका अापल्यावर बसण्याची चिंता अायुक्तांसह प्रशासनाला वाटू लागली अाहे. त्यामुळे तातडीने काही उपाययाेजना करण्याच्या दिशेने म्हणून अायुक्तांनी पाणीपुरवठा काळात ‘भारनियमन’ करण्याबाबत वीज मंडळाला पत्र देण्याचा निर्णय घेतला अाहे.

या निर्णयामुळे सामान्य जनतेचा राेष प्रशासनासह नगरसेवकांनाही सहन करावा लागण्याची शक्यता अाहे. खराेखरच वीजसंकट हाेते, त्या काळात नाशिककरांनी सक्तीचे भारनियमन यापूर्वी प्रदीर्घ काळ सहन केले अाहे. मात्र, महापालिकेच्या नळांना थेट माेटारी लावून पाणी खेचणाऱ्यांना राेखण्याचा साधा अन् सरळ पर्याय उपलब्ध असताना पालिका प्रशासनाने असा उफराटा निर्णय घेतल्यास नागरिकांच्या पायाभूत सुविधा मिळण्याच्या अधिकारांवरच गदा येण्याची शक्यता अाहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाला नागरिकांकडूनच तीव्र विराेध हाेणार यात शंका नाही.

१७९ माेटारी जप्त, दीड लाखाचा दंड
पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या, तसेच माेटारीद्वारे पाणी उपसा करणाऱ्या नागरिकांकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात अाला अाहे. सर्वात महत्त्वाचे, १७९ माेटारी जप्त करण्यात अाल्या अाहे. तसेच, २९४ नागरिकांना उधळपट्टी करणाऱ्याबाबत प्राथमिक ताकीद देण्यात अाली अाहे.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे हाल
महासभेत पाणीपुरवठा जलसंपदा खात्याने दिलेल्या अहवालानुसार अायुक्त डाॅ. गेडाम यांनी अाठवड्यातून दाेन दिवस पाणी बंद करण्याचे संकेत दिले अाहेत. त्याची अंमलबजावणी कधीपासून हाेईल याविषयी घाेषणा झालेली नाही. शहराच्या बहुतांश भागात सकाळी ते या वेळेत सर्वाधिक, म्हणजे ७० टक्के पाणीपुरवठा केला जाताे. त्यामुळे टाकीचा व्हाॅल्व्ह उघडण्याच्या वेळेतच तेथील फीडरचा वीजपुरवठा बंद ठेवला जाईल. परिणामी, पहाटे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...