आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Extension To The Set Top Box : Central Additional Secratary

सेटटॉप बॉक्ससाठी मुदतवाढ नाहीच :केंद्रीय अतिरिक्त सचिव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शासनाने सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी जाहीर केलेल्या 31 मार्च या अंतिम मुदतीत वाढ होणार नसून, कुठल्याही स्थितीत त्यापूर्वीच सेटटॉप बॉक्स बसवा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय अतिरिक्त सचिव सुप्रिया साहू यांनी मल्टिसिस्टिम ऑपरेटरांना (एमएसओ) दिल्याने आता त्यांची धावपळ अधिकच वाढली आहे.

साहू यांनी ‘डॅश’ प्रणाली लागू केलेल्या 38 शहरांच्या एमएसओ आणि नोडल अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात नोडल अधिकार्‍यांकडून सध्या सेटटॉप बॉक्स आणि डीटूएच बसविलेले ग्राहक आणि बसविणे बाकी असलेल्या ग्राहकांची माहिती मागवित उर्वरित ग्राहकांना बॉक्स त्वरित बसविण्यासाठी सूचना दिल्या. ग्राहकांना त्वरित सेटटॉप बॉक्स उपलब्ध करून देण्याचे आदेश एमएसओंना दिले. याबाबत विविध चॅनल्सवरून जाहिराती देण्याचे, खासगी एफएमवर जिंगल्स सोडण्याचे व स्थानिक वृत्तपत्रातून जाहिराती देऊन ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.

एमएसओंनी पॅकेज तत्काळ जाहीर करावे
एमएसओंनी ग्राहकांना देण्यात येणारे पॅकेज तत्काळ जाहीर करावे. जेणेकरून ग्राहकांना निवडीचा पर्याय खुला राहील. तसेच, सेटटॉप बॉक्सचे दरही जाहीर करण्याच्या सूचना केंद्रीय सचिवांनी दिल्या आहेत. मात्र, एमएसओंनी 31 मार्चपूर्वी ते अशक्य असल्याचे सांगितले.

31 मार्चपूर्वी पॅकेज जाहीर करणे अशक्य
431 मार्चपूर्वीच केबलचे पॅकेज जाहीर करणे अजिबात शक्य नाही. कारण, ग्राहक संख्येवरूनच चॅनलमालक आमच्याशी करार करणार आहेत. त्यांच्या करारावर आधारित पॅकेज व त्याची निश्चिती करावी लागेल. तसे करावयाचे असल्यास प्रशासनाने मध्यस्थाची भूमिका घेत चॅनल्स चालविणार्‍यांना चर्चेसाठी प्रोत्साहित करावे. आनंद सोनवणे, एमएसओ, डेन कंपनी

सेटटॉप बॉक्ससाठी 999 रुपयेच द्यावे
सेटटॉप बॉक्सचे दर सर्वच कंपन्यांनी 999 रुपये जाहीर केले आहेत. या दरामध्ये सेटटॉप बॉक्सची किंमत 799 रुपये व दोनशे रुपये बॉक्स बसविण्यासह सेवाशुल्काचा समावेश आहे. मात्र, अनेक केबलचालक बाराशे ते पंधराशे रुपये यासाठी घेत ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. परंतु, ग्राहकांनी त्यापेक्षा अधिक पैसे देण्याची आवश्यकता नाही. यासाठी ग्राहकांनी जादा दर देऊ नये.

नाशकात 1 लाख 31 हजार ग्राहकांनी बसविले बॉक्स
नाशिक शहरात सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार, तीन लाख 18 हजार 530 ग्राहकांकडे टीव्ही संच आहेत. त्यापैकी अंदाजे एक लाख 31 हजार 599 ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसविले आहेत. तर, 79 हजार 507 ग्राहकांकडे डीटूएच आहे. दोन्ही मिळून जवळपास 24.96 टक्के ग्राहक आहेत. त्यात केवळ डीटीएचचे 41.31 टक्के, केबलचे 66.27 टक्के ग्राहक आहेत. मात्र, 31 मार्चनंतरच सत्य आकडेवारी समोर येईल. त्यानंतर उर्वरित ग्राहकांची संख्याही समोर येणार आहे.