आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनास्था: व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्या स्थापल्या अाहेत. परंतु, या शेतकऱ्यांचीच बाजार समितीमध्ये गैरसोय होत आहे. नाशिक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी भाजीपाल्यावर उभे राहून लिलाव पुकारतात. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर भाजीपाल्याची नासाडी होत असल्याचे पाहावे लागत आहे, तर समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत.
नाशिक बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे येथे व्यापाऱ्यांना खरेदीसाठी हक्काचे ठिकाण निर्माण झाले आहे. भाजीपाला विक्रीनिमित्त बाजार समिती शेतकऱ्यांकडून मार्केट फी, हमाली, तोलाई, आडत असे सर्व प्रकारच्या फी आकारत असते. मात्र, त्याच शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यावर उभे राहून नासाडी करण्याचे प्रकार येथे सुरू आहेत. त्याचप्रमाणे भाज्यांच्या जुड्या चोरण्याचे प्रकार अजून कमी झाले नसल्याने, दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांना साधे लघुशंकेसाठीही भाजीपाला सोडून जाता येत नाही. तसेच, ज्या ठिकाणी भाजीपाला ठेवला जातो त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने मेथी, कोंथिबीर, शेपू, हिरवी मिरची, भेडी, टोमॅटो हे तेथेच ठेवले जाते. त्यामुळे शहरातील ग्राहकांना खराब भाजीपाला खावा लागत आहे. त्यामुळे शहरी ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी मॉलची वाट पकडताना दिसत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
सुविधा नाहीत
बाजार समितीने भाजीच्या जुड्यांची चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही, कर्मचारी ठेवले आहेत. तरीही येथे चोऱ्या होतात. या प्रकाराकडे बाजार समितीचे सचिव, उपसचिव कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना बसण्यासाठी सुविधा नसल्याने मार्केट फी देण्याबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. विविध फी देऊन सुविधा मिळत नसेल तर फी घेऊ नये, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
बातम्या आणखी आहेत...