आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुविधांच्या गर्तेत अाैद्याेगिक वसाहत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागोजागी पडलेले खड्डे, खचलेल्या साइडपट्ट्यांमुळे अंबड येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची चाळणी झाली आहे. उद्याेजकांसह या वसाहतीत दैनंदिन कामासाठी येणाऱ्या पंचवीस हजारांवर कामगारांना रस्त्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत अाहे. पावसाळा सुरू झाला, तरी महापालिका किंवा एमअायडीसी कररूपी कराेडाे रुपये वसूल करणाऱ्या पालक संस्थांना पावसाळापूर्व कामांचा विसरच पडला अाहे. यामुळे एकूण करसंकलनाच्या साठ टक्के कर जेथून येताे, अशा अाैद्याेगिक वसाहतींप्रति महापालिका प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर अाली अाहे. औद्योगिक वसाहतीतील या असुविधांवर ‘डी.बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
अंबड अाणि सातपूर एमअायडीसी वर्षाला महानगरपालिकेकडे ८०० काेटींचा कर भरते. मात्र, त्या तुलनेत महानगरपालिका या दाेन्हीही एमअायडीसींना सुविधा पुरविण्यात सातत्याने अपयशीच ठरत अाहे. सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याने वेगळ्या अाैद्याेगिक नगरीची मागणीही उद्याेजकांकडून करण्यात अालेली अाहे.

वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने, त्यावरून जाताना कसरत करावी लागते. एवढेच नव्हे, तर माेठ्या स्वरूपाचा पाऊस झाला तर पाणी तुंबून पाणी थेट कंपन्यांच्या अात जाते. औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. शिवाय या वसाहतींत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिकही त्रस्त आहेत. पथदीप बंद असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते अाणि त्यामुळे कामगारांना काही ठिकाणी लुटण्याचे प्रकारही हाेत असतात.

अग्निशमनकेंद्र उभारणीला लालफितीचा विळखा : अंबडअाैद्याेगिक वसाहतीत अद्याप अग्निशमन केंद्रच नाही. अाग लागल्यावर अग्निशमन दलाला कळवल्यावर दलाचा बंब येईपर्यंत कंपनी जळून खाक हाेते. त्यामुळे कंपनी मालकाला माेठी अार्थिक झळ बसते. त्यामुळे अंबड अाणि सातपूर एमअायडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची मागणी २००९ पासून हाेत अाहे. एमअायडीसीने त्याकरिता गेल्या वर्षीच सिमेन्स कंपनीसमाेरील भूखंड अारक्षित केला असून, अग्निशमनने या केंद्राला मंजुरी दिली अाहे. मात्र, अद्याप बांधकामाच्या साध्या निविदाही निघू शकलेल्या नाहीत.
मनपाची उदासीनताच
याप्रश्नीमहापालिका काय नियाेजन करते अाहे, याबाबत मनपाच्या सिडकाे विभागीय अधिकारी अार. अार. गाेसावी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘बांधकाम विभागाशी बाेलून चाैकशी करून घ्या’ इतके माेघम उत्तर देत पालिका प्रशासनाची अाैद्याेगिक प्रशासनाबाबतची उदासीनता अधाेरेखित केली.

अायुक्तांची साधी वेळही मिळत नाही...
८० टक्के उत्पन्न महापालिकेला येथून मिळते. मात्र, सुविधा देण्याच्या नावाने बाेंब अाहे. महापालिका अायुक्तांसाेबत बैठकीकरिता अात्तापर्यंत दाेनदा मागणी करण्यात अाली. पण, त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात अाल्या. यावरून महापालिकेची नकारात्मक मानसिकता लक्षात येते. राजेंद्रअिहरे, सरचिटणीस, अायमा

शंभर टक्के कर; पण सुविधाच नाही
एलबीटी,घरपट्टी यांसारखे शंभर टक्के कर उद्याेजक महापालिकेला भरतात असे असतानाही वेगळी तरतूद या अाैद्याेगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांसाठी मागणी करूनही झालेली नाही. अायुक्तांसमवेत बैठकीकरिता अाम्ही वेळ मागून थकलाे, पण वेळ मिळत नाही. यामुळे समस्यांत वाढ झाली अाहे. सुरेशमाळी, माजी अध्यक्ष, अायमा

लेखीमागणी करूनही दरवर्षी त्रासच
दरवर्षी अाम्ही महापालिकेला याबाबत निवेदने देताे, डी सेक्टरमध्ये तर रस्ते खाली तर कंपन्या उंचीवर असल्याने या रस्त्यांवर पाणी साचते. कंपन्यांत जाणेही उद्याेजक, कामगारांना अवघड हाेते. याबाबत दाेन वर्षांपूर्वीच लेखी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत अाहे. विवेकपाटील, अध्यक्ष, अायमा
>बुधवारच्या पाऊस अाणि वाऱ्याने एक्स्लाे पाॅइंट, दातार कंपनीसह एका ठिकाणी अशी तीन झाडे उन्मळून पडल्याने कालपासून विजेचा खेळखंडाेबा.
>संपूर्ण अाैद्याेगिक वसाहतीत ११०० पथदीपांपैकी ५० टक्के बंद अवस्थेत. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य.
>एकूण १८ किलाेमीटरचे रस्ते. त्यापैकी तीन किलाेमीटर रस्त्यांची दाेन वर्षांपूर्वी सरफेसिंग. उर्वरित रस्त्यांवर बारा वर्षांपासून डांबरच नाही, खड्डे दुरुस्तीही नाही, त्यामुळे रस्त्यांची चाळणी.
>एक हजारावर ट्रक, कंटेनरसारख्या अवजड वाहनांची दिवसभर ये-जा, पण परिसरात एकही ट्रक टर्मिनसच नाही.
> पपयाज नर्सरी ते गरवारेपर्यंतच्या नव्याने हाेत असलेल्या रस्त्यावर पथदीपच नाहीत. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ.
>२२०० उद्याेग असलेल्या वसाहतीकरिता केवळ दाेन घंटागाड्या, एक नेहमी अाजारी, एकच गाडी देते सेवा. पण, तीही महिन्यातून एकदाच येत असल्याने कचऱ्याचे ढीग साचलेय.
>नालेसफाई झाल्याने अनेक सेक्टरमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी, अंधार, खड्डे अाणि पाणी यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून जाणे कामगारांना धाेकादायक ठरते.
अंधारामुळे हाेतेय कामगारांची लूट
सातपूरअंबड एमआयडीसीत साधारण साडेतीन हजार पथदीप आहेत. त्यापैकी ४० टक्के पथदीप विविध कारणांमुळे बंद आहेत. काही खांबांवर अजूनही दिवे लावण्यास मुहूर्त मिळालेला नाही. पथदीप पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण, सध्या महापालिकेत'एलईडी’च्या वादामुळे विद्युत विभागाचा कारभार कसा सुरू आहे, हे नवीन सांगायला नको. पण, याचा फटका एमआयडीसीतील साडेतीन हजार छोट्या-मोठ्या कारखान्यांतील कामगारांना बसला आहे. अनेक कामगार सायकलवरच जीव मुठीत घेऊन ये-जा करतात. त्यातील ६० टक्के कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करतात. त्यामुळे बऱ्याच कामगारांना आपला पगार रोख मिळतो. त्याचाच फायदा भुरटे चोर घेत असातात. तसेच औद्योगिक वसाहतींतील पथदीपांच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडून नियमितपणे करण्याची गरज अाहे.
कंपन्यांना पावसाच्या पाण्याचा माेठा धाेका
अंबडअाैद्याेगिक वसाहतीच्या पश्चिम बाजूला डाेंगर असल्याने पावसाचे पाणी वाहून एमअायडीसीत वेगाने घुसते. इतक्या माेठ्या अाैद्याेगिक वसाहतीत ड्रेनेजची व्यवस्थाच नसल्याने नैसर्गिक नाल्यांतून पाण्याचा निचरा हाेण्याची वाट पाहावी लागते अाणि याचकरिता पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नालेसफाई केली जाते. पण, याकरिता अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनला दरवर्षी पाठपुरावा करावा लागताे. यंदा मात्र अशाप्रकारे काेणतेच काम पावसाळा सुरू हाेऊनही झालेले नाही. यामुळे डब्ल्यू सेक्टरमधील कंपन्यांत पाणी घुसण्याचा अाणि काेट्यवधींचा कच्चा माल भिजण्याचा धाेका कायम असताे. दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या सुरुवातीच्या पावसानेच जागाेजागी गुडघ्यांइतके पाणी साचल्याचे चित्र या वसाहतीत अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्याने हा धाेका यंदा जास्त अाहे.
अनाराेग्याला अामंत्रण...
दरवर्षीअंबड सातपूर अाैद्याेगिक वसाहतीत नाशिक पालिकेतर्फे स्वच्छता माेहीम नालेसफाई माेहीम पावसाळ्यापूर्वी राबवली जाते. याहीवर्षी अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (अायमा)ने पालिकेच्या सिडकाे विभागीय कार्यालयाला माेहीम राबवणेबाबत पत्रव्यवहार करून विभागीय अधिकारी राजेंद्र गाेसावी यांची भेट घेतली. मात्र, टेंडर काढूनदेखील अद्याप परिसरात स्वच्छता माेहीम राबवण्यात अालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...